शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
3
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
4
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
5
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
6
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
7
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
8
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
9
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
10
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
11
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
12
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
13
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
14
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
15
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
16
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
17
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
18
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
19
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
20
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन

’मिळून साऱ्याजणी’ ई-पोर्टल स्वरूपात आणणार : विद्या बाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 12:57 PM

माणसाच्या आयुष्यातील तिशीच्या वयाचा विचार केला तर बालपण, तारूण्य ओलांडून थोडसं आपण स्थिरावत असतो. मासिकाच्या बाबत ते खरं आहे...

ठळक मुद्दे ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक  ‘ई-पोर्टल’ स्वरूपामध्ये आणण्यासाठी पावले उचलली जाणार

स्त्री-पुरूष समतेचा विचार देण्याबरोबरच ग्रामीण आणि शहरी जीवनाला जोडणारा संवाद सेतू विकसित व्हावा तसेच  स्त्री चळवळीचं केवळ मुखपत्र न ठेवता स्त्रियांच्या प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारं  त्यांच्या हक्काचं एक मासिक असावं, या उद्दिष्टातून सुरू झालेल्या  ‘मिळून सा-याजणी’ चा प्रवास आता तिशीपर्यंत येऊन ठेपला आहे. उद्या ( शनिवारी) या मासिकाचा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्त या मासिकाशी संपादक या नात्याने ममत्वाची नाळ जुळलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्याशी ’लोकमत’ ने संवाद साधला असता, आगामी काळात नव्या पिढीला जोडून घेण्यासाठी   ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक  ‘ई-पोर्टल’ स्वरूपामध्ये आणण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नम्रता फडणीस*  ‘मिळून सा-याजणी’ मासिक तिशीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहे, या  प्रवासाबददल काय सांगाल? - माणसाच्या आयुष्यातला तिशीचा टप्पा आणि ‘मिळून सा-याजणी’ च्या आयुष्यातील तिशीच्या टप्प्यामध्ये थोडसं साम्य आणि फरक देखील आहे. माणसाच्या आयुष्यातील तिशीच्या वयाचा विचार केला तर बालपण, तारूण्य ओलांडून थोडसं आपण स्थिरावत असतो. मासिकाच्या बाबत ते खरं आहे. मात्र हा तिशीचा काळ आजच्या बदलाच्या जेट युगात इतका मोठा आहे की 1989 मध्ये जी काही परिस्थिती होती. मोबाईल नव्हते. तेव्हाचं जग माणसांना जवळ वाटणारं, संवादी असं होतं. तरीही मासिक नव्याने सुरू करण्यामागे काही अडचणी होत्या.  कोणतही औद्योगिक पाठबळ नव्हतं.लोकांच्या सहभागातून हे मासिक सुरू केलं.केवळ माणसांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे हे इतकी वर्षं सुरू राहिलं. पैशाचं भांडवल नसूनही हे मासिक इतकी वर्ष  चाललं ते आता मिरँकलच वाटतं.* इतक्या वर्षात या मासिकानं काय कमावलं असं वाटत?- मासिकानं नेहमीच साधेपणा जपला. काही उत्साहाच्या घटना आजही आठवत आहेत. सुरूवातीच्या काळात 1990 मध्ये स्त्रियांचं शिबिर घेतलं होतं. हा खरंतर वर्धापनदिनाचा कार्यक्रम असू शकत नाही. पण त्यावेळी केला जायचा. जवळपास महाराष्ट्रातून 30 ते 50 स्त्रिया  आपल्या ’अधिकारा’च्या गाडीतून आल्या होत्या. याचं खूप समाधान वाटलं. त्यानंतर  ‘निशब्दता ओलांडताना’ हा कार्यक्रम केला होता. ज्यांनी आत्मचरित्र लिहिली अशा लालन सारंग, देविकां सारख्या स्त्रिया आणि पुरूषांनाही बोलावले होते. आनंदाची गोष्ट वाटते की विजय तेंडुलकर, गिरीश कार्नाड, महेश एलकुंचवार यांसारखी माणसं जोडली गेली. ‘भँवरीदेवी’ हे नाव विशेषत्वाने घ्यावे लागेल. बलात्कारी बाई भ्रष्ट होत नाही तर ती जखमी होते. ती तेवढीच सन्मानी असते. हे समाजाला दाखवून देण्यासाठी तिला आमंत्रित केलं होतं. * सोशल मीडियाच्या युगातही हे मासिक कशा पद्धतीने तग धरून उभं आहे?-लोकसहभाग आणि सोशल मीडियाला जो प्रतिसाद मिळतो तो मासिकात मिळत नाही. त्यामुळं कालपरत्वे मासिकात बदल करणं आता भाग आहे,मात्र तोही साधेपणा कायम ठेवूनच. आज मोबाईल मुळं जगण्याला एक वेग आला आहे. लोकांना छापील वाचायची गरज वाटत नाही. त्यामुळं अनेक नियतकालिकं कमी होत आहेत. हे लक्षात घेऊन मासिकाला नव्या युगाची भाषा शिकावी लागणार आहे. मासिकात तरूणांसाठी ‘दिवाळी विभाग’ सुरू करण्यात आला आहे. * आगामी काळात मासिक कोणत्या गोष्टींवर अधिक भर देणार आहे?- समाजमाध्यमावर जी काही चहलपहल सुरू आहे ती पाहाता  ‘मिळून सा-याजणी’चे  ‘ ई-पोर्टल’ तयार करणं, सध्याचे धार्मिक उन्मादाचे वातावरण पाहाता तरूणांपर्यंत शांतीचं महत्व पोहोचविण्यासाठी त्यांचे  ‘व्हॉटसअप’ ग्रृप तयार करणं. त्यांच्या समन्वयकांची बैठक घेणं. त्यांच्या समस्या आणि विचार जाणून घेणं.त्याचबरोबर ग्रामीण भागात मासिक म्हणावं तेवढं पोहोचलं नाहीये. त्यासाठी बचत गटांची स्पर्धा घेणं अशा अनेक गोष्टींवर भर दिला जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिलाSocial Mediaसोशल मीडिया