मिमीक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 02:32 PM2023-05-07T14:32:56+5:302023-05-07T15:11:47+5:30

अजित पवार चे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा

Mimicry is Raj Thackeray's birthright; Ajit Pawar mocked | मिमीक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

मिमीक्री करणे हा राज ठाकरेंचा जन्मसिद्ध हक्क; अजित पवारांनी उडवली खिल्ली

googlenewsNext

बारामती : मिमीक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना अजित पवार ची मिमिक्री करणे, अजित पवार चे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली.

बारामती येथे रविवारी (दि. ७) विकासकामांचा आढावा व नियोजित दौऱ्यानिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खरपुस समाचार घेतला. पवार म्हणाले, राज ठाकरे यांना मिमिक्री शिवाय दुसरे काय जमते.  मिमिक्री करणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेने मधून बाहेर पडल्यानंतर त्यांचे १४ आमदार निवडून आले होते. नंतर एक आमदार निवडून आला. जुन्नरच्या शरद सोनवणे यांनी मागच्या विधानसभेमध्ये त्यांच्याकडून तिकीट घेतले म्हणून मनसेचा एक आमदार त्यावेळी निवडून आला. नंतर २०१९ मध्ये कल्याणच्या आमच्या सहकाºयांनी त्यांची पाटी लावली म्हणून पुन्हा एकदा एक आमदार आला. त्यांना स्वत:चा पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवार ची मिमिक्री करणे, अजित पवार चे व्यंगचित्र काढणे यामध्ये जर समाधान वाटत असेल तर माझ्या राज ठाकरेंना शुभेच्छा आहेत, असे पवार यावेळी म्हणाले.

Web Title: Mimicry is Raj Thackeray's birthright; Ajit Pawar mocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.