पुणे: केरळपासून उत्तर कर्नाटकापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली असून, त्यामुळे राज्यातील बहुतांश ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली आहे. यामुळे राज्यात उन्हाळा सुरू झाला, असे वाटत असतानाच अचानक पुन्हा गारवा वाढला आहे. राज्यात सर्वात कमी किमान येथे तापमान अहमदनगर अंश सेल्सिअस नोंदविले १०.५ अंश गेले. ते सरासरीच्या तुलनेत ३.४ अंशाने कमी आहे.
याबाबत पुणे हवामान विभागाचे याबाबत प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, केरळपासून उत्तर कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर विदर्भात काही ठिकाणी बुधवारी पावसाची भुरभुर होण्याची शक्यता आहे.
विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विदर्भात २३ व २४ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ११.६, लोहगाव १५.२, अहमदनगर १०.५, जळगाव ११.४, कोल्हापूर १८.४, महाबळेश्वर १५.४, मालेगाव १४ सांगली १७.१, सातारा १४.७, सोलापूर १८.१, मुंबई १९, सांताक्रूझ १७.१. ७.४. रत्नागिरी १७.४, अलिबाग १७.४ पणजी १९.५, डहाणू १७, ४, औरंगाबाद १५.५, परभणी १६.८, नांदेड १६.८, बीड १५.२, अकोला १५.२, अमरावती १४.७, बुलढाणा १६, ब्रह्मपुरी १५.४, चंद्रपूर १४.२, गोंदिया १४.२, नागपूर १२.४, वाशिम १५, वर्धा १४.५.