संक्रांती सणाला लागणारे सुगडी (मातीचे खण) बणवन्याचे कामात सध्या राजुरीतील कुंभारवाडा व्यस्त आहे. येथील राजेंद्र ज्ञानेश्वर जाधव हे गेल्या वीस वर्षांपासुन सुगडी बणवन्याचे काम करत असून सुगडी बणवन्याबरोबर ते बैल पोळा या सणासाठी लागणारे बैल तसेच मातीच्या चुली देखील बनवत आहेत तसेच हे बणवत असताना जाधव यांना कोरोणाचा मोठया फटका या व्यवसायाला बसला आहे. या. वर्षी जाधव यांनी पंचविस रूपये एका खणासाठी बाजारभाव ठेवला आहे. कोरणामुळे बनवलेल्या मातीच्या खणांची विक्री होते की नाही याची भिती आहे असे जाधव यांनी सांगितले.
--
२५राजुरी कुंभारवाडा खण बनविण्याचे काम
फोटो ओळी : मकर संक्रांत काही दिवसांवर आल्याने या सणासाठी लागणारे सुगडी बणवण्याचे काम बोरी बुद्रुक या ठिकाणी चालु असताना