इंदापूर : इंदापूरमध्ये सुरू असलेल्य विकास कामांचा ऑनलाईन उद्घघाटन समारंभ सुरु होता. यावेळी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या कार्यक्रमाला शरद पवार कामाच्या व्यापामुळे उपस्थित राहू शकले नाही असे सांगितले. परंतू, ऑनलाईन पद्धतीने का होईना त्यांनी पुढील काळात नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशी इच्छा देखील व्यक्त केली.
...अन् थोड्याच वेळात शरद पवारांनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावली.थोडक्यात काय तर या प्रसंगांनी भरणे मामांची इच्छा पवारांनी अशाप्रकारे पूर्ण केली. यामुळे कार्यकर्ते व उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार अचानक खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आयोजित केलेल्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात चक्क ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली
भरणे म्हणाले, कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे ऑनलाइन पध्दतीने विकास कामांची उद्घाटने करत आहोत. असे असले तरीदेखील,नवीन अद्यावत ऑनलाईन पद्धत चांगली आहे. पुढील काळात पवार साहेब देखील आगामी अशा ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होऊन आपणास मार्गदर्शन करतील. राज्यमंत्री भरणे यांचा हा शब्द बाहेर पडताच,चक्क शरद पवार ऑनलाइन कॅमेरासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या शेजारी सहभागी झाले. व तालुक्यातील नागरिकांना नमस्कार करत शुभेच्छा दिल्या.