इंदापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातआमदार असताना तालुक्याला सर्वाधिक विकासनिधी खेचून आणणारे आमदार व त्यानंतर राज्यमंत्री होवून तुफान विकासनिधी आणणारे म्हणून ज्यांची ख्याती निर्माण झाली असे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे क्रिकेटच्या मैदानातही तुफान फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली.
इंदापूर शहरात कै. अजित ढवळे फाऊंडेशन व श्रीनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, नगरसेवक अनिकेत वाघ, अमर गाडे, पोपट शिंदे, वसीम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील जनता खूप हुशार असून, जनतेला गोलंदाजी आणि फलंदाजी चांगलीच जमते आहे. त्यामुळे विरोधकांनी भ्रमात राहू नये. जनतेला विकासकामे करणारे आणि विकास कामांना अडथळा आणणारे कोण आहेत हे चांगले लक्षात येते. तरुणांनी क्रिकेट खेळाबसरोबरच समाजसेवा करण्यावर भर द्यावा असाही मोलाचा सल्ला दिला._____________
इंदापूरची जनता कधी कोणाची विकेट काढेल सांगता येत नाही इंदापूरची जनता प्रचंड हुशार आहे. जनतेला खरे खोटे सांगण्याची गरज नाही, त्यांना सर्व समजत असते. त्यामुळे जनतेला कमी समजण्याची गरज नाही, इंदापूर तालुक्यातील जनता क्रिकेट मैदानात आणि राजकीय मैदानातही कधी कोणाची विकेट काढतील सांगता येत नाही. असे प्रतिपादन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. _____________