पुणे: बावधन परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने केबल तोडणाऱ्यांविरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज दिले.
चांदनी चौकातील दुमजली उड्डाणपूल आणि स्मार्टसिटीच्या कामांमुळे बावधन आणि अन्य परिसरातील वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर तनपुरे यांनी शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती.
चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामामुळे या परिसरात वारंवार खोदकाम करण्यात येत असुन त्यामुळे वीजपुरवठा खंडीत होत आहे. महापालिका आणि महामार्ग प्राधिकरण याची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रयत्न करत होते. केला. यावर मंत्री तनपुरे यांनी दोषी शोधून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.
याबाबत सूत्रांनी सांगितले की, स्मार्टसिटीची कामे करताना केबल वारंवार तुटून वीजपुरवठा खंडीत होत असल्याचे आढळून येत असल्याचा महावितरणचा दावा आहे. तर महापालिकेच्या म्हणण्यानुसार त्यांच्या ठेकेदाराकडून एकदाच केबल तुटली होती आणि ती जोडून देत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.
...........