पुणे : फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी बिकिनीवर ‘ऑडिशन’ घेण्याच्या निमित्ताने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आळेफाटा (ता. जुन्नर) येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका उद्योगपतीविरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र दगडू गायकवाड (पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत आळेफाटा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 जून 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे येथील एका हॉटेलच्या रूममध्ये ‘ऑडिशन’ घ्यायची यासाठी गायकवाड याने फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिचे आई-वडील यांना बोलावून घेतले. त्यांनतर हॉटेलच्या एका रूममध्ये गायकवाडने मुलीला नेऊन काही ‘डायलॉग’ बोलण्यास सांगितले. तसेच तिच्या आई-वडिलांना तुम्ही बाहेर बसा. तुम्हाला ती लाजत आहे, असे सांगून त्यांना बाहेर पाठवले. दरम्यान यानंतर 8 नोव्हेंबर 2022 रोजी गायकवाडने मुलीच्या वडिलांना पुन्हा फोन करून मी कामानिमित्त आळेफाटा येथे येत आहे. तेव्हा तुमच्या मुलीचे ‘ऑडिशन’ घेतो आणि तिच्यामध्ये काय सुधारणा झाली आहे का? ते पाहू म्हणत गायकवाड मुलीच्या राहत्या घरी आळेफाटा येथे आला.
आई-वडीलांना बाहेर पाठवून केला अत्याचार-
त्यानंतर मुलीच ऑडिशन घ्यायचाय आहे. असे सांगून मुलीच्या आई-वडिलांना घराबाहेर जाण्यास सांगितले. ऑडिशन घेण्याचे बहाण्याने मुलीला कपडे काढण्यास सांगितले व यानंतर तिच्यावर अत्याचार केले. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता धमकी देऊन गायकवाड तिथून निघून गेला. झालेला प्रकार अल्पवयीन मुलीने आई-वडिलांना सांगितला.
याप्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक रागिणी कराळे अधिक तपास करत आहेत.