शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा आरोप करणारी बेपत्ता तरुणी सापडली; लवकरच पुण्याला आणणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:11 PM

शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता

पुणे : शिवसेना कामगार नेते रघुनाथ बबनराव कुचिक याच्याविरोधात 24 वर्षीय तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. कुचीकने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर ती गरोदर राहिली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून त्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार तरुणीने केली होती. त्यानंतर तरुणी गायब झाली असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले होते. वाघ यांनी मुलीला गायब केल्याचा कुचीकवर आरोपही केला होता. आता ही मुलगी गोव्यात आढळून आली आहे. या मुलीने स्वत: फोन करून मला ही माहिती दिल्याचे वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. 

 दरम्यान बेपत्ता झालेल्या तरूणीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. तीचं काल लोकेशन पणजी दाखवत होते. पोलीस तसा तपास देखील करत होते.  असे सांगत चित्रा वाघ यांनी ती मुलगी जिथं कुठे आहे ती सुखरूप असावी अशी प्रार्थना देखील केली होती. त्यासोबतच त्यांनी रघुनाथ कुचीक यानेच त्या मुलीला बेपत्ता केलं नसेल ना? असा सवाल देखील त्यांनी काल उपस्थित केला होता.

तरुणीशी फोनवर बोलणं झालं 

'शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्याचारित केलेली मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती. काल रात्री साडे अकराच्या सुमारास तिचा मला फोन आला होता. तिनं सांगितलं की मी कुठं आहे, मला माहिती नाही. पण मला मदतीची गरज आहे, असं ती म्हणाली. रात्रीची वेळ असल्याने मी तिला आजूबाजूच्या घरांचे दरवाजा ठोठवायला सांगितलं. त्यापध्दतीने तिनं केलं. एका गृहस्थाने मदत केली. त्यांच्याशी मी बोलले.   गोवा पोलिसांना दिली माहिती  कोलवा हे गोव्यातील मडगाव मधलं एक गाव आहे. असे त्या गृहस्थाने सांगितले. त्यानंतर मी त्या गृहस्थाला मुलीला घेऊन गोवा पोलिसांकडे जायला सांगितले. दरम्यानच्या काळात तिच्याशी मी बोलले. त्यावेळी तिनं सांगितलं की, काही लोकं होती, त्यात पोलीसही होते. मला इंजेक्शन देण्यात आली. माझ्याकडून काही पेपर्सवर सह्या घेतल्या. नंतर काय झालं आठवत नाही. आता याठिकाणी पडली आहे, असं मुलीनं सांगितल्याची माहिती वाघ यांनी दिली. 

तरुणीला पुण्याला आणणार 

मी ताबडतोब पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांच्याशी संपर्क साधून घटनेबाबत सांगितले. त्यानुसार आता पुणे शहर आणि ग्रामीणच्या टीम गोव्यात पोहचतील. मुलीचे आई-वडीलही घरून तिथं पोहचतील. मुलीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहितीही वाघ यांनी दिली.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघgoaगोवाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना