शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू
2
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
3
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
5
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
6
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
7
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
8
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
9
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
10
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
11
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
12
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
14
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
15
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
16
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
17
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
18
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
19
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
20
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल

सोशल मीडियावरही ‘मिशन राजकारण’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:33 IST

तब्बल एक महिना रंगलेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्यात मंगळवारी वेगवान घडामोडी घडल्या.,..

पुणे : मोहीम फत्ते!, ‘पवार’फुल गेम, ‘८० व्या वर्षी ८० तासांत सरकार पाडलं’, ‘पवारच किंगमेकर’, ‘मी पुन्हा चाललो’, ‘मी पुन्हा येईन... वर्षावरील सामान घ्यायला’, ‘पडण’वीस सरकार... अशा विविध पोस्टचा सोशल मीडियावर मंगळवारी अक्षरश: पाऊस पडला. तब्बल एक महिना रंगलेल्या सत्तासंघर्षाच्या महानाट्यात मंगळवारी वेगवान घडामोडी घडल्या. अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची केलेली घोषणा, महाविकास आघाडीची स्थापना, उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा या सर्व राजकीय घटनांचे पडसाद सोशल मीडियावर उमटले.तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार, हे जवळपास निश्चित झाले असतानाच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट मध्यरात्री हटवण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान २४ तासांमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा दिलेला निकाल आणि अजित पवारांची माघार यामुळे आणखीनच रंगत वाढली. फडणवीस सरकार ७८ तासांत कोसळले आणि याबाबत नेटिझन्सनी राजकारण झोडपून काढले. ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’.... अजितदादा म्हणतात, मी नाही येत... घरचे सोडत नाहीत’...सर्वात जास्त कार्यकाळ आणि सर्वात कमी कार्यकाळ-दोन्ही विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर जमा... वस्ताद एक डाव शिकवतो, पण एक डाव कायम राखून ठेवतो... राज्य झोपेत असताना शपथविधी, पुणेकर झोपेत असताना राजीनामा... क्यूं हिला डाला ना... फडणवीसांनी राजीनामा रात्री दिला असता तरी चाललं असतं, मी जागाच असतो-इति राज्यपाल’ अशा अनेक प्रतिक्रिया फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध माध्यमांमधून व्यक्त झाल्या. विविधांगी प्रतिक्रियांमधून नेटिझन्सच्या हुशारीची जणू चुणूकच पाहायला मिळाली. ‘मोठा गेम...जो माध्यमांनाही समजला नाही’...‘उद्यापासून ‘सूत्रे’ बेरोजगार होणार’...‘काका-चुलत्यांनी केला गेम’ अशी मार्मिक टिपण्णीही यानिमित्ताने नेटिझन्सकडून केली.......सोशल मीडियामुळे सर्वांनाच अभिव्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. सामाजिक, राजकीय अशा सर्वच घटनांवर सोशल मीडियावर वेगाने प्रतिक्रिया उमटत असतात. महाराष्ट्रातील राजकीय नाट्यानंतरही हेच चित्र पाहायला मिळाले. यानिमित्ताने अनेक नागरिकशास्त्राची माहिती देणाºया पोस्ट, घटनेतील बारकावेही जाणून घेता आले, अशी प्रतिक्रियाही सोशल मीडियावरच व्यक्त झाली. 

टॅग्स :PuneपुणेSocial Mediaसोशल मीडियाPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार