पुणे : सध्या कोणत्याही प्रकारच्या लहान-मोठ्या आॅपरेशनसाठी रुग्णाला भूल दिली जाते. आॅपरेशन यशस्वी करण्यासाठी भूलतज्ज्ञांची (अॅनस्थेटिस्ट) भूमिका महत्त्वाची असते. परंतु रुग्णांना देण्यात येणा-या भुलीबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत. अवयवदानाप्रमाणेच भुलीबाबतदेखील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत पुण्यातील भूलतज्ज्ञांनी व्यक्त केले.जगात सर्वांत प्रथम १६ आॅक्टोबर १८४६ रोजी रुग्णाला यशस्वीपणे भूल दिली गेली. तेव्हापासून १६ आॅक्टोबर जागतिक भूलशास्त्र दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वीच्या काळी भूल देण्यासाठी वापरली जाणारी क्लोरोफॉर्मसारखी औषधे आणि पद्धती इतिहासजमा झाल्या आहेत. आता भूलशास्त्रात आमूलाग्र बदल झाले आहेत.भुलीबद्दल अनेक गैरसमज आहेत. रुग्णांना आॅपरेशनसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन मोजून-मापून भुलीचा डोस दिला जातो. पण जर आॅपरेशन लांबले तर मग काय पुन्हा इंजेक्शन देता का? असे अनेक प्रश्न पेशंटच्या आणि नातेवाइकांच्या मनात असतात. भूल दिल्यानंतर भूलतज्ज्ञ पेशंटला सोडून कुठेही जात नाही.आॅपरेशनच्या वेळी भुलीचे प्रमाण गरजेनुसार कमी किंवा जास्त करतात आणि योग्य प्रमाणात ग्लुकोज अथवा सलाइन शिरेतून देतात. आॅपरेशन व भुलीमुळे पेशंटच्या शरीरात अनेक बदल घडत असतात. या सर्व बदलांवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांच्यावर औषधोपचार किंवा इतर इलाज करून नियंत्रण ठेवणे हे भूलतज्ज्ञांचे महत्त्वाचे काम असते. सरतेशेवटी भूल उतरवावी लागते. थोडक्यात काय, तर योग्य भूल योग्य प्रमाणात देणे आणि आॅपरेशन संपल्यानंतर भूल उतरवून पेशंटला सुरक्षितपणे भुलीतून बाहेरकाढणे, हे सगळे अतिशय जोखमीचे काम असते. ते शिकण्यासाठी एमबीबीएस झाल्यानंतर हे डॉक्टर तीन वर्षांचा एमडी किंवा डीएनबीचा अभ्यासक्रम पूर्ण करून या पदव्या मिळवितात. त्यानंतरच त्यांनाभूल देण्याची परवानगी आणि अधिकार मिळतात.आॅपरेशनसाठी ज्या इतर लोकांचे सहकार्य लाभते, त्यांच्याबद्दल बºयाचदा माहिती नसते.त्यामधील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे भूल देणारे डॉक्टर. भूलतज्ज्ञ (अॅनस्थेटिस्ट) हे डॉक्टरच असतात.आॅपरेशनच्या वेळी पेशंटच्या शरीराच्या भागांवर चिर देण्याची आवश्यकता असते. अशी चिर देणे व आॅपरेशन करणे हे अतिशय वेदनामयी असते. या वेदना सामान्यत: कुठलाही पेशंट सहन करू शकत नाही.यावर रामबाण उपाय म्हणजे बधिरीकरण, म्हणजेच भूल. भूल देणे वाटते तेवढे सोपे नाही. आॅपरेशनच्या आधी भूलतज्ज्ञ पेशंटला पूर्णपणे तपासतो व रक्त, लघवी, एक्स-रे व ई. सी. जी. आदी रिपोर्ट बघतो आणि कशा प्रकारची भूल द्यावयाची ते ठरवितो.जनजागृतीची गरजभूल देण्यासाठी वापरल्या जाणºया औषधांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यामुळे भूल देताना निर्माण होणाºया धोक्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. आता भूलशास्त्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. परंतु याबाबत अद्यापही नागरिकांमध्ये प्रचंड गैरसमज आहे. यामध्ये प्रामुख्याने सुशिक्षित नागरिकांमध्ये अधिक गैरसमज आहेत. याबाबत आता अधिकाधिक जनजागृती होण्याची गरज आहे.- डॉ. मनीष पाठक,भूलतज्ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल
भुलीबाबत समाजात गैरसमज, जागतिक अॅनस्थेशिया दिन : अवयवदानामध्ये भूलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 3:11 AM