शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

महिला पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देत मित्रानेच उकळली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:09 AM

पुणे : सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत एका महिला पोलीस उपनिरीक्षकाकडूनच पैसे उकळणाऱ्या तरुणाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खंडणी, जबरी ...

पुणे : सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत एका महिला पोलीस उपनिरीक्षकाकडूनच पैसे उकळणाऱ्या तरुणाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खंडणी, जबरी चोरी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धांत भगवानराव जावळे (वय ३०, रा. माजलगाव, जि. बीड) असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षांच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाघोली परिसरात सप्टेंबर २०२०पासून सुरू होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे. तो सतत घेत असलेल्या संशयामुळे व त्यातून करत असलेल्या शिवीगाळ आणि मारहाणीला कंटाळून फिर्यादीने त्याला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तेव्हापासून तो फिर्यादींच्या नातेवाईकांना फोन करून फिर्यादीसोबत त्याचे लग्न लावून द्या नाहीतर मी आत्महत्या करेन, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत होता. एवढेच नाही तर आरोपीने सोशल मीडियावर फिर्यादीचे त्याच्यासोबत असलेले फोटो, व्हिडीओ बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसारित करून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तुझी नोकरी सोडून दे, पाच वर्षांचा पगार मला दे किंवा तत्काळ माझ्याशी लग्न कर असे म्हणत वेळोवेळी फिर्यादींना फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले. आरोपी फिर्यादींकडे पैशासाठी तगादा लावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान आरोपीकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिला पोलिस उपनिरीक्षकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावरून लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.