पुणे - इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेले पोलिस संरक्षण स्वीकारण्यास आमदार दत्तात्रय भरणे यांनी नकार दिला आहे.संपूर्ण इंदापूर तालुका हेच माझे कुटुंब आहे. जनता हेच सुरक्षा कवच आहे. कुटुंबामध्ये वावरताना कुठल्या ही प्रकारच्या सुरक्षेची गरज आपल्याला भासत नाही, अशी भावना या संदर्भात आमदार भरणे यांनी व्यक्त केली आहे.सन २०१४ पासून आमदार भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र ते कधी ही पोलिसांच्या गराड्यात वावरताना जनतेला दिसले नाहीत. अगदी सहजपणे विना पोलिस संरक्षण ते मतदार संघात चौफेर फिरत असतात. पोलिस संरक्षण नसलेले महाराष्ट्रातील कदाचित एकमेव आमदार असावेत,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आत्ताच्या विधानसभा निवडणुकीनंतर ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले. तद्नंतर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून त्यांना संरक्षणासाठी दोन शस्त्रधारी अंगरक्षक पुरवण्यात आले होते. मात्र संरक्षण स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार देताना आपल्या भावना उपरोक्त शब्दांमध्ये मांडल्या. त्यावरून सतत लोकांच्या संपर्कात राहणे, त्यांच्यासाठी सहजपणे उपलब्ध होणे हेच त्यांच्या यशाचे खरे गमक असल्याचे जे आवर्जून बोलले जाते ते अनाठायी नाही याची प्रचिती दिसून आली.
पुण्यातल्या 'या' आमदाराने नाकारले पोलीस संरक्षण; नेमकं कारण काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:26 IST