जुन्नर येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांनी नुकताच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. याच निमित्ताने सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात येथील जिल्हा परिषद गटाच्या वतीने भाजपच्या सभेचे व सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. बेल्हा येथे झालेल्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाआघाडीच्या सरकारवर निशाणा साधत अनेक आरोप केले. ५० वर्षांत सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते. मात्र तरीही पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते सांगतात की, आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत. कष्टकऱ्यांचे नेते आहोत. मात्र ज्या बारामती विधानसभा मतदारसंघात यांनी निवडणूक लढवली त्या मतदार संघातल्या ४४ गावात शेतीला पाणी नाही. पिण्याला पाणी नाही. तीच अवस्था जुन्नरमधील पठारावर आहे. ज्या तालुक्यात ५ धरणे आहेत.त्या तालुक्यातील जनता आज पाण्यासाठी उपाशी आहोत. छत्रपती असते तर कडेलोट केला असता राज्यात दुधाला दर नाही, बैलगाडा शर्यत चालू होत नाही, जनावरांचे बाजार दोन-दोन वर्षे बंद आहेत. या देशात जेवढ्या प्रादेशिक पार्ट्या आहेत. या घराणेशाही जपणाऱ्या पार्ट्या असून पंडित नेहरू,राजीव गांधी,सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी असे अध्यक्ष आहेत.१९९८ पासून त्यांनी अध्यक्ष बदलला नाही. पण भाजपमध्ये अनेक अध्यक्ष बदलले. राष्ट्रवादीनेही अजून अध्यक्ष बदलला नाही.त्यांना एकच अध्यक्ष. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विसर्जित करण्याची वेळ आली. मग कधी अध्यक्ष बदलणार असा सवाल पडळकर यांनी केला. बैलगाडा मालकांच्या भावनाशी सरकार खेळत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घोषणा केली की बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे माघारी घेणार मात्र ८ दिवस होऊनही अद्याप एकही पोलीस स्टेशनला पत्र किंवा आदेश आले नाहीत.बैलगाड्याच नाव घेत आम्ही इथे मत मागायला आलो नाही असं सांगत शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाही पडळकर यांनी लक्ष केले. सरकार आल्यावर अनिल देशमुखांसारखा माणूस शोधून आणला. पवारांनी त्याला गृहमंत्री केला. जो चिल्लर स्वत: खाईल आणि नोटा बारामतीला पोहच करेल. म्हणून दिलीप वळसे पाटलांना माझा सल्ला आहे. सावध राहून काम करा. कारण राष्ट्रवादीच्या नेत्यांची वाटचाल तुरुंगाच्या दिशेने सुरू आहे. यावेळी जिल्हा प्रमुख गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, अतुल देशमुख,जयसिंग एरंडे, संतोष तांबे, संगीता वाघ, दिलीप गांजाळे, अर्चना माळवतकर, अमोल शिंदे, महेंद्र सदाकाळ, सुनंदा गाडगे,ताराचंद कऱ्हाळे,डाॅ.दत्ता खोमणे,मोहन मटाले,संतोष खैरे, ॠषीकेश डुंबरे, शंकर शिंदे, किशोर तांबे, राजू आहेर, आशिष माळवतकर,बाळासाहेब दाते,मुक्ता दाते व विविध ठिकाणांहून आलेले असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आशाताई बुचके म्हणाल्या की या पुढील निवडणुका सर्व ताकदीने भाजपा लढवणार आहे.
सजविलेल्या बैलगाडीतून कार्यक्रमस्थळी आले.
080921\20210907_194559.jpg
बेल्हा(ता.जुन्नर)येथे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर दिसत आहेत.