शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

Mukta Tilak passed away: पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 4:23 PM

गेल्या काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या.

पुणे: भाजपच्या आमदार व माजी महापौर मुक्ता शैलेश टिळक यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांची खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली.

उद्या (शुक्रवारी) सकाळी 9 ते 10 या वेळेत नारायण पेठेतील त्यांच्या निवास स्थानी त्यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुक्ता टिळक या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार आहेत. मुक्ता टिळक यांनी 2017 ते 2019 या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले. त्या भाजपच्या पहिल्या महापौर ठरल्या. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू श्रीकांत टिळक यांच्या सूनबाई आहेत. बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून आहेत. टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी होत. पुण्यातील भावे स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलेल्या मुक्ता टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. पुणे विद्यापीठातून त्यांनी जर्मन भाषाही शिकली. मार्केटिंग विषयात त्यांनी एमबीएची पदवी मिळवली. मुक्ता टिळकांनी पत्रकारितेचे शिक्षणही घेतले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केले आहे.  आमदार होण्यापूर्वी त्या पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या. सदाशिव-नारायण पेठेतील प्रभाग क्रमांक 15 च्या त्या नगरसेविका म्हणून नेतृत्त्व करत होत्या. त्या सलग चारवेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. पुणे भाजपच्या महापालिकेतल्या गटनेत्या, स्थायी समितीच्या सदस्या अशा जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर 2017 मध्ये त्या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या. त्या महापौर असतानाच 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाल्या होत्या. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMukta Tilakमुक्ता टिळकMLAआमदारBJPभाजपा