आमदार पलूसचा तरी पुणे कायम स्मरणात : विश्वजीत कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:55 PM2018-05-29T21:55:54+5:302018-05-29T21:55:54+5:30
माझा पुण्याशी फारसा संबध नव्हता, मात्र सन २०१४ मध्ये राहूल गांधी यांचा फोन आला.त्या लोकसभा निवडणुकीमुळे पुण्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. तसेच त्या पराभवाने कणखर देखील केले.
पुणे : माझा पुण्याशी फारसा संबध नव्हता, मात्र सन २०१४ मध्ये राहूल गांधी यांचा फोन आला व लोकसभेची निवडणूक लढवावी लागली, काही ज्येष्ठांना संधी हवी होती, मात्र मला आदेश पाळावा लागला, त्यावेळी अनेक आरोप झाले व त्यातूनच कणखर होत गेलोे असे प्रतिपादन पलूस कडेगावचे नवनिर्वाचित आमदार विश्वजीत कदम यांनी केल
पलूस कडेगाव मधून आमदार झाल्याबद्धल पुणे शहर काँग्रेसच्या वतीने कदम यांचा काँग्रेस भवन येथे सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष रमेश बागवे, जिल्हाध्यक्ष संजय जगताप, आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चवधरी, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक रविंद्र धंगेकर, गोपाळ तिवारी, संगीता तिवारी तसेच काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वडील पतंगराव कदम यांचे स्मरण करून विश्वजीत म्हणाले, त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाची पुण्याईच मला उपयोगी पडली आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा होती. त्यात अडथळे येत गेले पण, ते कधी नाराज झाले नाहीत. त्यांच्याकडून हीच शिकवण मला मिळाली आहे. ती कधीच विसरणार नाही. राजकारणात त्यांच्यासारखेच वागेल व काम करेल.
पुणेकरांनी फार प्रेम दिले. त्यांना वाटले विश्वजीत कशाला पुण्याकडे लक्ष देईल, मात्र तसे नाही. पुण्यातील कोणीही माझ्याकडे कधीही आले तरी मी त्याच्या कामासाठी तत्पर राहील असे विश्वजीत यांनी सांगितले. पुणे शहर काँग्रेसचेच आहे, ते पुन्हा काँग्रेसचे होईल, मात्र त्यासाठी युवकांना ताकद दिली पाहिजे, विश्वास दिला पाहिजे. त्यांना संधी दिली तर ते पुणे लोकसभा मतदार संघ पुन्हा खेचून घेतील असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. यावेळी यावेळी रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर, शरद रणपिसे आदींची विश्वजीत यांचा गौरव करणारी भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात पतंगराव यांच्या आठवणींना उजाळा दिला.