शहरं
Join us  
Trending Stories
1
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
2
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
3
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
4
“लोकसभेत धसका, आता विधानसभेला आग्रहाची विनंती आहे की...”; शरद पवारांचे PM मोदींना साकडे!
5
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
6
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
7
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
8
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
9
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
10
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे
11
"आपल्याकडे हिरो ठरवतो सिनेमाची हिरोईन", संस्कृती बालगुडेनं सांगितलं सिनेइंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव
12
सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
13
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
14
भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड
15
पुण्यातील पब्स आणि बारवर महापालिकेची कारवाई, मराठी अभिनेता म्हणतो- "इतकी वर्ष मोकाट चालू दिलं..."
16
काय हे आयसीसी...! विजेत्या संघाला किती बक्षीस मिळणार? IPL पेक्षा काही लाखच जास्त...
17
बुलडोझर बाबाचा बुलडोझर गरीब आणि मागासवर्गीयांवर का? पवईतील अतिक्रमण कारवाईवरुन विजय वडेट्टीवार आक्रमक
18
पेपरफुटीविरोधात राज्य सरकार कडक कायदा करणार का? नाना पटोले यांचा सवाल
19
छोट्या गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, SEBI नं डीमॅट अकाऊंटच्या लिमिटमध्ये केले बदल
20
गजकेसरी योग: ८ राशींना लाभच लाभ, भाग्याचा काळ; यश-प्रगती, पदोन्नती-नफा कमवायची संधी!

आमदार राहुल कुल यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 11:17 PM

पुणे : आमदार राहुल कुल यांच्या गाडीला अपघात घडवून आणून त्यांना संपविण्याचा धमकीचा मेसेज पाठविणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सागर विनायक भानवसे (वय २९, रा़ कवडेचा मळा, वरंवड) आणि आकाश राजेंद्र होले (रा़ गार फाटा, पाटस) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना असा मेसेज पाठविण्यास कोणी सांगितले होते ...

पुणे : आमदार राहुल कुल यांच्या गाडीला अपघात घडवून आणून त्यांना संपविण्याचा धमकीचा मेसेज पाठविणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सागर विनायक भानवसे (वय २९, रा़ कवडेचा मळा, वरंवड) आणि आकाश राजेंद्र होले (रा़ गार फाटा, पाटस) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना असा मेसेज पाठविण्यास कोणी सांगितले होते का?, आमदार कुल यांचा खुनाचा कट कोणी रचला होता का, याचा तपास पोलीस करीत आहे.

याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, या दोघांनी पाटसमधील एका मोबाईल शॉपीमध्ये पश्चिम बंगाल येथील एका तरुणांची बनावट कागदपत्रांवरुन सीम कार्ड घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यातून जुना मोबाईल खरेदी केला. त्यानंतर आमदार राहुल कुल यांना संपविणार असलचा मेसेज टाईप करुन त्यांना पाठविला. त्यांनी हा मेसेज ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनाही पाठविला होता. हा मेसेज पाहून पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचा आदेश दिला. पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल नंबरवरुन तातडीने त्यांचा शोध घेऊन दोघांना अटक केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी कोणाच्या सांगण्यावरुन हा मेसेज पाठविला, राहुल कुल यांना मारण्याचा कोणी कट रचला आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. सोमवारी रात्री या प्रकाराची माहिती दौंड तालुक्यात पसरल्यानंतर कुल यांच्या कार्यकर्त्यांनी यवत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. आमदार राहुल कुल हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे निवडून आलेले एकमेव आमदार आहेत.

राहुल कुल यांना पाठविलेल्या मेसेजमध्ये ते त्यांचा खुन कसा घडवून आणणार याचीही माहिती दिली होती. त्यात त्यांच्या गाडीला दुसरी मोठी गाडी धडकवून त्यांचा अपघात घडवून आणून संपविणार, त्यांच्या गाडीत स्फोटके ठेवून ती उडवून देणार अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना संपविणार असल्याचे म्हटले होते. याबाबत राहुल कुल यांनी सांगितले की, पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे सध्या या विषयावर आपल्याला काहीही बोलायचे नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMLAआमदारPuneपुणे