पुणे : महात्मा गांधींनी खेड्यांच्या स्वावलंबनावर भर दिला होता. परंतु खेड्यांना स्वावलंबनाकडे नेण्याऐवजी मनरेगासारख्या शासकीय योजनांद्वारे ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविली जात आहे. या योजनेचे वर्णन ‘भिकारी तयार करण्याचा कारखाना’ असेच करावे लागेल, अशा शब्दांत महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी मनरेगा योजनेवरच ताशेरे ओढले.वकृत्वोत्तेजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे ‘सद्य परिस्थिती आणि महात्मा गांधी’ या विषयावरील पहिले पुष्प तुषार गांधी यांनी गुंफले.ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण सक्षमीकरणाऐवजी त्यांना ऐतखाऊ आणि आळशी बनविले जात आहे. त्यांच्या पंखांना ताकद देण्याऐवजी लाचार केले जात आहे. शेतकरी, सुशिक्षित तरुणदेखील मनरेगा आणि इतर सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या मानधनात समाधान मानत आहेत. ठरलेल्या मानधनापेक्षा ठेकेदाराने कमिशनपोटी काही रक्कम कापून घेतल्यास त्यास विरोध करण्याचे धाडस आणि धारिष्ट्यदेखील ग्रामीण जनता गमावून बसली आहे. अशी मानसिकता झाल्यास बापूंच्या स्वप्नातील किंवा त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताची आपण निर्मिती करू शकू का, असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला.‘मर्यादा पुरुषोत्तम’ या बिरुदाला साजेसे वर्तन करावेमहात्मा गांधींना ज्या प्रकारचे रामराज्य अपेक्षित होते त्याच्या अगदी विरुद्ध वाटचाल सुरू आहे. ज्या रामाचे नाव घेऊन सरकार सत्तेत आले, त्यांनी तरी ‘मर्यादा पुरुषोत्तम’ या रामाच्या बिरुदाला साजेसे वर्तन करावे. कर्नाटकातील सत्ता मिळविण्यासाठी ज्या प्रकारे घोडेबाजाराला चालना, उत्तेजन दिले गेले. ही परिस्थिती चिंताग्रस्त करते, असेही तुषार गांधी म्हणाले.राष्ट्रपुरुषांमुळेच लोकशाहीचा पाया मजबूतपं. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांनी भारतीय घटनेचा पाया मजबूत केला. लोकशाही अस्तित्वात असण्याचे श्रेय या राष्ट्रपुरुषांनी मजबूत बांधलेल्या पायाला द्यावे लागेल. नाहीतर पाकिस्तानसारखे लष्कराच्या हातात नियंत्रण गेले असते.- तुषार गांधी
मनरेगा म्हणजे भिकारी तयार करण्याचा कारखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 1:11 AM