पुणे : फेरीवाल्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. . त्यांचे स्टॉल आणि दुकाने यांची तोडफोड केली. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मनसेचे कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून अचानक फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे गट करून शहरातील विविध भागांत पाठविण्यात आले. जंगली महाराज रस्त्यावर कपडे, खाद्यान्न, पाणीपुरी विकत असलेल्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे स्टॉल उधळून लावण्यात आले. काही जणांना धक्काबुक्कीही करण्यात आली. पादत्राणांच्या दुकानांनाही या आंदोलनाचा फटका बसला.
पुण्यात मनसे कार्यकर्त्यांचा धुमाकूळ; उत्तर भारतीय चहा, पाणीपुरीवाल्यांची दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 6:15 PM
फेरीवाल्यांविरोधात मनसेने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण मुंबईपाठोपाठ पुण्यातही पोहोचले आहे. बुधवारी कार्यकर्ते नारायण पेठ येथील कार्यालयाजवळ जमा झाले होते. येथून फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठळक मुद्देगुरूवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागांत फेरीवाल्यांवर केले हल्लेमनसेच्या वतीने फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याची करण्यात आली होती मागणी