या बाबत पुणे जिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक व मुख्याधिकारी शिरुर यांना निवेदन दिले आहे. यावेळी
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,
भाजपाचे शहराध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे ,,भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे ,नगरसेवक संदिप गायकवाड ,बाबूराव पाचंगे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर ,विजय नरके ,राजू शेख ,अशोक शेळके प्रमोद गायकवाड , बंडू दुधाणे , हुसेन शहा ,रवींद्र सानप ,रेश्मा शेख ,रेश्मा क्षीरसागर , केशव लोखंडे ,उमेश शेळके आदी उपस्थित होते .
****************
शिरुर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले की, याबाबत राज्य परिवहन महामंडळ , विभाग नियंत्रक , पुणे यांना या तक्रारीचे अनुषंगाने महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या मालकीच्या जागेचे मालकी हक्कांचे पुरावे व जागेचा मोजणी नकाशा याची भुमापन कार्यालय शिरूर यांचे मार्फत तात्काळ पडताळणी करून अद्ययावत सिटी सर्व्हे उतारे व नकाशे पुन्हा नगरपरिषदे कडे सादर करावेत अन्यथा नियमानुसार कारवाई करणेत येईल .असे नगर परिषदेचे वतीने पत्र दिले आहे .