याप्रसंगी जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, रवींद्र गारुडकर, कामगार सेना जिल्हाध्यक्ष मनोज खराबी, तालुकाध्यक्ष संदीप पवार, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष तुषार बवले, उपाध्यक्ष मंगेश सावंत, शहराध्यक्ष अजय तापकीर, विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष मंगेश काळे, उपशहराध्यक्ष वैभव काळे, गणेश गायकवाड, शहर संघटक सागर बुर्डे, विभाग अध्यक्ष मंगेश कुबडे, आधार भामरे, सचिव कुणाल खोलपुरे, महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर वाढेकर, ऋषिकेश सानप, अशोक पुरी, ललित राणे, अभिजित गुंड, भरत दांगट, यश पाटील, योगेश मोरे, महादेव डेबरे, ज्ञानेश्वर दुगाने, मोहन शिंदे, विजय घोडगे, तेजस नागरगोजे, आणता इंगळे, आणता तळपदे, एकनाथ डोगरे, महादेव खेरडेकर आदी उपस्थित होते.
एकीकडे जनता कोविडच्या संकटाने त्रस्त आहे. मात्र मानसिकदृष्ट्या शांती आणि शक्ती देणारी श्रद्धास्थाने बंद आहेत. त्यामुळे जनतेच्या भावनांचा विचार करून राज्य सरकारने मंदिरे खुली करावी, अन्यथा जनता आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन उभे राहील, असा इशारा या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, आरती करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत घंटानाद आंदोलन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)