महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अन्य भाषेत लावलेले स्टिकर बदली करण्यासाठी फोन पे यांचे बाणेर येथील कार्यालयाला भेट देऊन १५ दिवसांत अन्य भाषेतील पुणे परिसरातील चिटकवलेले स्टिकर काढून फक्त मराठीतच लाववेत यासाठी मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले. अन्य भाषेतील ५००० पेक्षा जास्त स्फोन पे स्टीकर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बाणेर प्रभाग अध्यक्ष अनिकेत मुरकुटे, उपविभाग अध्यक्ष रमेश उभे, उपविभाग अध्यक्ष अशोक दळवी, शाखा अध्यक्ष अभिजित चौगुले, गणेश चव्हाण उपस्थित होते.
अनिकेत मुरकुटे म्हणाले, महाराष्ट्रमध्ये फोन पे ॲप कंपनीने अन्य भाषेतील स्टिकर आस्थापनांवर लावली आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या फोन पे कंपनीने अन्य भाषेतील स्टिकर त्वरित काढावेत व मराठी भाषेतील फलक लावावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.