राजगुरुनगर : मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर नामदेव थिगळे यांच्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार झाल्याची घटना राजगुरुनगर (सातकरस्थळ,पुर्व) येथे शनिवारी (दि २१) घडली. घराशेजारीच राहणाऱ्या मिलिंद विठ्ठल जगदाळे याने गोळीबार केला. तसेच गोळीबारानंतर त्याचा भाऊ मयूर विठ्ठल जगदाळे याने समीरला घरात जाऊन मारहाण केली. दोघांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी मयुर जगदाळे याला अटक केली असून मिलिंद जगदाळे फरारी आहे
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर उर्फ अजय नामदेव थिगळे हे घरात असताना त्यांना शेजारी राहणाऱ्या मिलिंद यांनी बाहेर बोलावून घेतले. पूर्वी खून झालेल्या पप्पू वाडेकर यांच्या स्मरणार्थ भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी पैसे का दिले? अशी विचारणा केली. त्यांना पैसे देतो ,मग मला पण गाडी दुरुस्तीसाठी पैसे असे म्हणत ३५ हजार रुपयांची खंडणी मागितली. हे करताना मिलिंद याने सुरुवातीला जवळ आणलेल्या पिस्तुल काढुन समीर यांच्या डोक्यावर पिस्तूल लावून दहशत निर्माण केली. डोक्यावर लावलेल्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली नाही. मात्र त्यानंतर ट्रिगर मागेपुढे करून मिलिंद याने हवेत गोळीबार केला व पुन्हा समीर याच्या छातीवर पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची मारण्याची धमकी दिली. मात्र या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.