शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पुण्यातील नवनियुक्त शहर पदाधिकाऱ्यांची 'शाळा' 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:23 PM

ही कार्यकारिणी अधिक आक्रमकपणे काम करणार असून महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग समित्यांच्या स्तरावर नागरी प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या गैरप्रकारांबाबत आंदोलने छेडणार असल्याचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे येत्या शुक्रवारी शहरातील नवनियुक्त पदाधिका-यांची  ‘शाळा’ घेणार आहेत. शहराध्यक्ष बदलण्यात आल्यानंतर आता शहराची नवी कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. (MNS president Raj Thackeray to take meeting of newly appointed leaders)

ही कार्यकारिणी अधिक आक्रमकपणे काम करणार असून महापालिका निवडणूकांच्या अनुषंगाने प्रभाग समित्यांच्या स्तरावर नागरी प्रश्न आणि लोकप्रतिनिधींच्या गैरप्रकारांबाबत आंदोलने छेडणार असल्याचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

मोरे आणि मनसे नेते बाबू वागस्कर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेकडूनही तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेचे 2017 साली झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. यावेळीही तेच ध्येय ठेवण्यात आल्याचे मोरे म्हणाले. नवीन कार्यकारिणीमध्ये माजी नगरसेवकांना समाविष्ट करुन घेत मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला असून विभागप्रमुखपदी नव्या दमाचे कार्यकर्ते नेमण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले.नवीन कार्यकारिणीमध्ये उपशहर अध्यक्ष, शहर सचिव, शहर संघटक, विभाग अध्यक्ष, विभाग सचिव, कार्यालयीन कामकाज, प्रसार माध्यम सचिवांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. मनसेने जाहिर केलेल्या 45 जणांच्या कार्यकारिणीमध्ये (फादर बॉडी) एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. यावर मनसेने महिलांची स्वतंत्र शाखा अस्तित्वात असून त्यांनाही याच प्रकारे पदे दिली जाणार असल्याचे सांगितले. परंतु, अन्य पक्षांप्रमाणे फादर बॉडीमध्ये स्थान देण्याबाबत भविष्यात विचार केला जाणार असल्याचे मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले.  

नवीन शहर कार्यकारिणीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मान्यता घेण्यात आली आहे. आगामी पालिका निवडणूका, आंदोलने याबाबतचे सर्व नियोजन या कार्यकारिणीद्वारे केले जाणार आहेत. वर्षभरानंतर आढावा घेऊन काही बदलही केले जातील. येत्या शुक्रवारी राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याचे वागस्कर यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPuneपुणे