शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर; पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस बैठका घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 10:51 AM

बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार

ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या ९० जागांवर मनसेचं लक्षकेंद्रित ४५ जागा निवडून आणण्याचा मनसेच्या नेत्यांचा दावा

पुणे : जुलै महिन्यापासून राज ठाकरे यांचे तीन पुणे दौरे झाले आहेत. आज पुन्हा चौथ्यांदा पुण्याला भेट देण्यासाठी आले आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात राज ठाकरे पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शिवाय बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत .राज ठाकरे हे 6 ऑगस्टलाही पुणे दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज पुन्हा दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.   

मागच्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ३० जुलैला पुण्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली आहे. त्याआधीच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे  हे १९, २० आणि २१  जुलै अशा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरेंचा पुढचा पुणे दौराही ठरला होता. आठ दिवसांनी म्हणजे ३० जुलैला राज ठाकरे पुन्हा  होती. त्यानंतर आता राज ठाकरे आज पुन्हा पुणे दौऱ्यावर आले आहेत.

पुणे महापालिकेच्या ९० जागांवर मनसेचं लक्षकेंद्रित 

आगामी पुणे महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील ९० जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच ४५ जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत. दरम्यान, प्रभार रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. 

बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी 

आज १३ ऑगस्टला बाबासाहेब पुरंदरे तिथीप्रमाणे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे मोदी पुरंदरेंना ऑनलाईन शुभेच्छा देणार आहेत. यावेळी राज ठाकरे कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

पुणे महापालिकेतील पक्षांच्या जागा 

भाजप – ९९राष्ट्रवादी – ४२शिवसेना – १०काँग्रेस – १०मनसे – २एमआयएम – १एकूण जागा – १६४ 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक