आगीच्या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली. शाळेसाठी आवश्यक निधी योग्य त्या कारणासाठी न वापरता त्याचा वापर अनावश्यक खर्चासाठी केला जात आहे. स्वच्छता, डागडुजी, सुरक्षा यंत्रणा, तसेच इतर अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना देखील स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करतात. आगीच्या घटनेची चौकशी करून दोन दिवसांत शाळेला स्वतः भेट देऊन सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन शिक्षण प्रमुख दौंडकर यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वडगाव शेरी विभाग अध्यक्ष सुनील कदम, मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य रुपेश घोलप यांच्यासह पक्षाचे लक्ष्मण काते, मनोज ठोकळ, वंदना साळवी, कुलदीप घोडके, दत्ता माळी, जेमा चव्हाण, महेश शिंदे, जय जगताप, कीर्ती माछरेकर, निशिकांत चव्हाण, बाळा आहिवाळे, अभिजित शिरोळे, संतोष काते उपस्थित होते.