पुणे : फ्रेसेनियस काबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. यासंबंधीच्या तक्रारी मनसे कामगार सेनेकडे आल्या होत्या. त्यानंतर मनसेने याविषयी कंपनीकडे विचारणा केली. मात्र कंपनीने याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे आक्रमक पवित्र घेत मनसेने 'खळखट्याक' आंदोलन करत कंपनीच्या कार्यालयाची तोडफोफ केली. या तोडफोडीचा व्हिडिओ मनसे पदाधिकारी रुपाली पाटील- ठोंबरे यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.
पुण्यातील सोमवारी (दि. २२) मनसेने फ्रेसेनियस काबी कंपनीत खळखट्याक आंदोलन केले. या तोडीफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी रुपाली- पाटील ठोंबरे म्हणाल्या, 'फ्रेसेनियस काबी कंपनीच्या २५ ते ३० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या तक्रारी मनसे कामगार सेनेकडे आल्या होत्या. त्यानंतर सचिन गोळे यांनी काही दिवसांपूर्वी कंपनीला त्याबाबत विचारणा केली. गोळे आणि सहकाऱ्यांनी चर्चेसाठीही तयार असल्याचे कंपनीला निवेदन देखील दिले होते. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना हाताशी घेऊन कामगारांना कामावरून काढून टाकत आणि मनसे कामगार सेनेसोबतही चर्चा नाकारली.
बेकायदेशीररित्या कामगारांना कामावरून कमी करणे, कामगारांना पगार वाढणार न करणे. कामगारांवर अन्याय करणे, संघटनेला चर्चेला वेळ न देणे, संघटनेचा नाम फलक लावण्यास विरोध करणे, असे आरोप मनसेने कंपनीवर केले आहे.
कोरोनाच्या काळात अर्धे पगार, बाहेर नोकरी शोधायची म्हणजे आधीच लोकांची कामं ठप्प झाले असल्याने ती अडचण आणि आता कुठे परिस्थिती सुधारायला लागली तरी कंपनी कामगारांना शॉर्ट नोटीसवर थेट कामावरून काढून टाकते.यामुळे मराठी कामगार मेटाकुटीला आले आहेत. मराठी कामगारांना काढायचं आणि बिहार, झारखंड इथून आलेले कामगार भरायचे, अशी कंपन्यांची धोरणं असतात. काबी कंपनीला चर्चेतून मार्ग काढू असं सुचवलं असतानाही कंपनीने मनमानी केली म्हणून आम्हाला मनसे स्टाईल विरोध करावा लागला असेही पाटील यावेळी यांनी सांगितले.