पुणे : एका टोळक्याने हॉटेलवर दगडफेक करून दहशत माजविल्याची घटना शुक्रवारी घडली. कात्रजजवळील आंबेगाव परिसरात टोळक्याने एका टेम्पोवर दगडफेक करून काच फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत हॉटेल चालक महेश मोरे-पाटील (वय ३५,रा. न-हे रस्ता, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे यांचे न-हे रस्त्यावर जगदंब हॉटेल आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री आठच्या सुमारास चार ते पाचजण हॉटेलजवळ आले. टोळक्याने मोरे यांचे हॉटेल बंद होते. टोळक्यातील काहीजणांनी हॉटेलच्या दरवाज्यावर दगडफेक केली, तसेच बाजूला लावण्यात आलेल्या एका टेम्पाची काच फोडली. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर तपास करत आहेत.
----------------------------------