शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

मोबाइल जॅमर चाललेच नाहीत! यूपीएससी पूर्वपरीक्षा केंद्रांवरील प्रकार, १२ हजार ३७२ उमेदवार अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 5:53 AM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली.

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली. त्याचवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचण्यास थोडाही उशीर झाला तर त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.यूपीएससी पूर्वपरीक्षेत मोबाइलचा वापर करून गैरप्रकार करण्याचे काही प्रकार उजेडात आल्याने यंदा परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर बसविण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी हे मोबाइल जॅमर कार्यान्वितच झाले नाहीत. यामुळे यंदा तरी हा प्रयोग यशस्वी होऊ शकलेला नाही. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एकीकडे नियमावर बोट ठेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरायचे आणि दुसरीकडे मोबाइल जॅमरसारख्या उपाययोजना मात्र फेल ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील ७४ परीक्षा केंद्रांवर यूपीएससीची पूर्वपरीक्षा पार पडली. पुणे शहरातून ३० हजार ४३० विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरला होता, मात्र १८ हजार ३०१ उमेदवारांनीच ही परीक्षा दिली. तब्बल १२ हजार १२९ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. परीक्षेला अनुपस्थित राहण्याचे प्रमाण यंदा खूपच मोठे राहिले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी दोन तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास पाच-दहा मिनिटे उशीर झाला तरी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे त्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी (पान ५ वर)२.३० ते ४.३० अशी परीक्षेची वेळ होती.परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक उमेदवारांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्रात वेळेपूर्वी दोन तास अगोदर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागली. त्याचबरोबर दोन पेपरच्या मध्येही खूप जास्तीचा गॅप ठेवण्यात आला होता. त्याचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. एका विद्यार्थींनीला परीक्षा केंद्रात पोहचण्यास ५ मिनिटेच उशीर झाला होता, मात्र तिला प्रवेश दिला नाही अशी तक्रार तिने केली आहे.पहिलाच प्रयोगअसल्याने अडचणीपरीक्षा केंद्रावर पहिल्यांदाच मोबाइल जॅमर बसविण्यात येत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या सत्रात ते सुरू करता आले नाहीत. दुसºया सत्रात मात्र बहुतांश ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.- प्रल्हाद हिरामणी,परीक्षा समन्वयक व तहसीलदार

टॅग्स :examपरीक्षा