ठळक मुद्दे दे दणा दण गाण्याची सोशल मिडीयावर धूम२०१५ च्या विश्वचषकासाठी धोनीवर पहिलं रॅप साँग
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभरात आहे. त्याचे निस्सिम चाहते त्याच्यासाठी काय करतील याचा नेम नाही. पुण्यातल्या त्याच्या एका मराठी चाहत्यानं धोनीसाठी रॅप साँग तयार केलं आहे. स्वप्नील बनसोडे या पुणेकर चाहत्यानं दे दणा दण गाणं तयार केलं आहे.सध्या देशभरात आयपीएलचा फिव्हर आहे. त्यामुळे चाहते आपल्या संघासाठी आणि आवडत्या क्रिकेटरसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नीलने देखील अशाच प्रकारे धोनीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे. चेन्नई सुपर किंगला पाठिंबा दर्शविला आहे. चाकणमध्ये स्वप्नीलचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. त्यावरच त्याची उपजीविका चालते. परंतु आवड म्हणून तो रॅप तयार करतो. रॅपर व्हायचं स्वप्नीलचं स्वप्न आहे. चार वर्षांपूर्वी स्वप्नील टीव्ही वर रॅप साँग पाहत होता. त्यावेळी त्याला आपणदेखील रॅप साँग करू शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्याने त्यावर खूप मेहनत घेतली. २०१५ च्या विश्वचषकसाठी अरे अपनी जीत तो होनी है कप्तान महेंद्रसिंग धोनी है अस पहिलं रॅप साँग तयार केलं. ते खूपच व्हायरल झालं होतं. याहीवर्षी त्याने महेंद्रसिंग धोनीवर हे वेगळे गाणे गाणे तयार केले आहे.त्याच्या या आगळ्यावेगळ्या छंदाचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यामुळे त्याला जागतिक पातळविर मोठी प्रसिध्दी मिळु लागली आहे.
.........................
ग्रामीण भागातील तरुण काहीही करू शकतात तसेच आपल्या कलांना जर खत पाणी दिल तर आपणही यशस्वी होऊ शकतो.-स्वप्नील बनसोडे.