श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील इयत्ता दहावी व बारावीमधील हुशार, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्यावतीने ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल संच वितरित करण्यात आले यावेळी ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मांडवगण चे माजी सरपंच किसनराव फराटे हे होते.
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल बोरा व सचिव नंदकुमार निकम यांचा मांडवगण फराटा ग्रामस्थांच्या तसेच प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एस. टी. गद्रे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शिरूर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे, संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, बाबासाहेब फराटे, सरपंच शिवाजीराव कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हनुमंत फराटे, ऊर्जा उद्योगसमूहाचे अध्यक्ष प्रकाश कुतवळ, घोडगंगाचे संचालक शंकरराव फराटे, लतिका जगताप यांची भाषणे झाली.
यावेळी राजीव फराटे पाटील, चंदुलाल चोरडिया, प्रकाश बोरा, संतोष फराटे पाटील, पांडुरंग फराटे, उपसरपंच सुभाष पाटील फराटे, प्रा. चंद्रकांत धापटे, प्रा. सतीश धुमाळ, अमोल जगताप, विजय फराटे, गणेश फराटे, सुधीर मचाले, धनंजय फराटे, गोरक्ष शितोळे, बाळासाहेब फराटे उपस्थित होते. उपमुख्याध्यापक सुनील थोरात यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक प्रमोद बाऊसकर यांनी आभार मानले.
मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या वतीने मोबाइल संच वितरित करताना उपस्थित मान्यवर.