शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोबाइल शूटिंगचे अधिकार

By admin | Published: January 06, 2017 7:01 AM

महापालिका निवडणुकीत खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग आणि मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुवाटपावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने

पिंपरी : महापालिका निवडणुकीत खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग आणि मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुवाटपावर अंकुश ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता मोबाइलचाही मदत घेतली आहे. ज्या ठिकाणी व्हिडीओ सर्व्हेलियन्स टीम उपलब्ध नसेल त्या ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोबाइलद्वारे अशा घटनांचे चित्रीकरण करावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीत होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत राज्य निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याअंतर्गत निवडणुकीसाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करताना खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक नियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीवर पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक, प्राप्तिकर, विक्रीकर, उत्पादनशुल्क, तसेच बँकांचे वरिष्ठ अधिकारी अनिवार्य सदस्य असणार आहेत. तर महावितरण, आरटीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्यापीठ, महापालिकेतील माहिती अधिकारी हे आवश्यकतेप्रमाणे सदस्य राहणार आहेत. या समितीवर इतर अधिकारी घेण्याचे अधिकारही महापालिका आयुक्तांना राहणार आहेत. या समितीला कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच प्रत्येक उमेदवार व राजकीय पक्ष यांनी खर्चाबाबतची माहिती वेळेवेर सादर करणे, रोख रकमांच्या ने-आण संदर्भात लक्ष ठेवणे, त्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक, हॉटेल, फार्म हाऊस यावर नजर ठेवावी लागणार आहे. मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवावे लागणार आहे. (प्रतिनिधी)