शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

गारवा हॉटेल मालकाच्या खून प्रकरणातील १० जणांवर 'मोक्का' कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 18:57 IST

१८ जुलैला उरुळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा खून झाला होता.

ठळक मुद्देआरोपींवर एकूण २१ गुन्हे दाखल असल्याचे झाले निष्पन्न

लोणीकाळभोर : ऊरूळी कांचन येथील  गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांचे खुनाचे गुन्हयातील १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

१८ जुलैला रात्री पावणे नऊच्या सुमारास उरुळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांचा खून झाला होता. तपासादरम्यान सदरचा गुन्हा बाळासाहेब खेडेकर यांनी त्यांच्या मालकीचे अशोका हॉटेलचा व्यवसाय वाढविण्याचे उद्देशाने तसेच हॉटेल व्यवसायातील स्पर्धेतुन त्यांचा भाचा सौरभ ऊर्फ चिम्या व इतर यांना दररोज एक ते दोन हजार देण्याचे सांगून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे या गुन्हयात बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय-२४, दोघे रा. खेडेकरमळा, उरुळी कांचन, ता. हवेली ) सौरभ ऊर्फ चिम्या कैलास चौधरी ( वय २१, रा. अशोका हॉटेलचे पाठीमागे, खेडेकरमळा उरुळी कांचन ) अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा. सोरतापवाडी, ता. हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकडवस्ती, सहजपुर, ता. दौड ) प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३ वर्ष, रा कॅनरा बँकेचे मागे शिंदावणे रोड, उरुळी कांचन ), गणेश मधुकर माने ( वय २० ), निखिल मंगेश चौधरी ( वय २०, दोघे रा. कोरेगाव मुळ, ता. हवेली ) निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. गल्ली नं.५, तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ) व काजल चंद्रकांत कोकणे ( वय-१९, रा. घर नं. ए/०६ इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे ) यांना अटक करण्यात आलेली असुन हे दहाजण सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे न्यायालयीन कस्टडीमध्ये न्यायबंदी आहेत. तसेच एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हददीत या गुन्हयातील आरोपी हे टोळी वर्चस्व आणि आर्थिक फायदयासाठी संघटित गुन्हे करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हयातील आरोपी निलेश आरते हा हडपसर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तसेच इतरांवर यापुर्वी जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, जबरी चोरी करणे, हत्यार व अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे विविध प्रकारचे हडपसर व लोणी काळभोर पोलीस ठाणे येथे एकूण २१ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग कल्याणराव विधाते, हे करीत आहेत. सदरची उल्लेखनिय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, संदीप धनवटे, गणेश भापकर यांचे पथकाने केली आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPoliceपोलिसArrestअटकPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी