शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कात्रज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चुहा गँगच्या म्होरक्यासह ५ जणांवर मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 8:42 PM

आरोपी संघटीतपणे २०१७ पासून गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहेत

पुणे : खंडणी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्हे करुन कात्रज परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या चुहा गँगच्या म्होरक्यासह पाच जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.साकीब मेहबुब चौधरी ऊर्फ लतिफ बागवान (वय २२), चंद्रशेखर ऊर्फ शेखर ठोंबरे (वय २४), तन्वीर जमीर सय्यद (वय २७), ऋतिक चंद्रकांत काची (वय वय १९, रा. चौघेही रा. संतोषनगर, कात्रज) व अझरुद्दीन दिलावर शेखर (वय २०, रा. अंजलीनगर, कात्रज) अशी अशी मोक्का कारवाई केल्यांची नावे आहेत.

साकीब चौधरी व त्याच्या साथीदारांनी ३ जुलै रोजी रात्री साडे आठ वाजता दत्ता नथू जाधव (वय ४४, रा. नवीन वसाहत, कात्रज) हे आरोपींच्या टोळीच्या हालचालींची माहिती पोलिसांना देतो, अशा संशयावरून आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी साकीब चौधरीसह त्याच्या साथीदारांना तात्काळ अटक केली. आरोपी संघटीतपणे २०१७ पासून गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहेत.

पोलिसांनी आरोपींवर हद्दपारीची कारवाई करूनही आरोपींमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांच्याविरुद्ध "मोका'अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर शिंदे यांनी संबंधीत कारवाईला मंजुरी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक