शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

आंदेकर टोळीवर मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:13 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या मध्य वस्तीतील सर्वात जुनी टोळी असलेल्या आंदेकर टोळीवर आता संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहराच्या मध्य वस्तीतील सर्वात जुनी टोळी असलेल्या आंदेकर टोळीवर आता संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का अंतर्गत) कारवाई करण्यात आली. टोळीतील ११ जणांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायालयाने त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. टोळीप्रमुख बंडु ऊर्फ सूर्यकांत आंदेकर (वय ६०, रा. नाना पेठ), नंदकुमार नाईक (वय ७२, रा. शुक्रवार पेठ) या दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऋषभ देवदत्त आंदेकर (वय २२, रा. रास्तापेठ), हितेंद्र विजय यादव (वय ३२), दानिश मुशीर शेख (वय २८), योगेश निवृत्ती डोंगरे (वय २८), विक्रम अशोक शितोळे (वय ३४), अक्षय दशरथ अकोलकर (वय २८), स्वराज उर्फ शक्ती निलंजय वाडेकर (वय १९, सर्व रा. नानापेठ), प्रतिक युवराज शिंदे (वय १८, रा. मंगळवारपेठ, जुना बाजार), यश संजय चव्हाण (वय १९, रा. लक्ष्मीनगर, आंबेडकर वसाहत, पर्वती), देविदास उर्फ देवा बाळासाहेब गालफांडे (वय २१, रा. रामगडवस्ती, विश्रांतवाडी) आणि वैभव नितीन शहापुरकर (वय १९, रा. नानापेठ, धनगरवाडा) अशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची नावे आहेत.

----------------------

याबाबत ओंकार गजानन कुडले (वय २१, रा. बांबु आळी, गणेश पेठ) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुडले आणि आंदेकर टोळीतील काही जणांचे वाद होते. कुडले आंदेकर टोळीच्या वर्चस्वाला आव्हान देत असल्याने २१ फेब्रुवारी रोजी त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. कुडलेवर बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून साथीदारांनी वार केले होते. याप्रकरणी आंदेकरसह गाडी गण्या, सूरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आंदेकरला मध्यरात्री नाना पेठ भागातून अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे , सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी मोक्काच्या कारवाईच्या अनुषंगाने प्रस्ताव दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करत आहेत.

ओंकार कुडलेला मारण्यासाठी दिले ५ लाख

अटक करण्यात आलेले आरोपी हे आंदेकर टोळीतील सदस्य असून त्याच्यावर देखील गुन्हे दाखल असून ते सक्रीय गुन्हेगार आहेत. वर्चस्वाच्या वादातून व आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून खुनाचा प्रयत्न झाला आहे. पुणे शहरामध्ये मागील काही महिन्यात टोळी प्रमुख आंदेकर याच्या टोळीतील गुंडांनी समर्थ, बंडगार्डन, कोंढवा, विश्रामबाग व खडक पोलिस ठाण्याच्या परिसरात प्राणघातक हल्ले केले आहे. आंदेकर याने घातक शस्त्रे व वाहने व मनुष्यबळ पुरविणे याचे नियोजन करून आर्थिक पुरवठा केला आहे. त्यांचे आणखी कोण साथीदार आहेत. बंडू आंदेकर याने एकाकडून १० लाख रूपये आणले होते. त्यापैकी ५ लाख रूपये त्याने स्वतःकडे ठेवून उर्वरित ५ लाख रूपये ओंकार कुडले याला ठार मारण्यासाठी दिले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. ही रक्कम त्याला कोणी दिली याचा तपास करायचा आहे. गुन्ह्यातील हत्यारे, वाहने जप्त करायची आहेत. त्याने गुन्हेगारीतून मिळालेल्या पैशातून पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या व कुंटुंबाच्या नावावर स्थावर मालमत्ता निर्माण केली आहे. त्याने बँकेत काही रोकड गुंतवली आहे का ? याचा तपास करायचा आहे. बंडू आंदेकर याला फरासखाना पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. शिक्षा भोगून आल्यानंतरही त्याच्यावर कायद्याचा कोणाताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या टोळीला पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली.