शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मुनाफ पठाण टोळीविरुद्ध मोक्का कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा परिसरात दहशत माजविणाऱ्या मुनाफ पठाणसह टोळीतील १० जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढवा परिसरात दहशत माजविणाऱ्या मुनाफ पठाणसह टोळीतील १० जणांवर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या वर्षात आतापर्यंत १४ टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

मुनाफ रियाज पठाण (वय २३, रा. नाना पेठ), कृष्णाराज सूर्यकांत आंदेकर (वय ३१, रा. नाना पेठ), विराज जगदीश यादव (वय २५, रा. हांडेवाडी रोड, आनंदनगर, हडपसर), आवेज आशपाक सय्यद (वय २०, रा. गणेश पेठ), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (वय २५, रा. नाना पेठ), अक्षय नागनाथ कांबळे (वय २३, रा. ससाणेनगर, हडपसर), शहावेज ऊर्फ शेरु अब्दुल रशिद शेख (वय ३४, रा. गुरुवार पेठ), अमन युसुफ खाने (वय २०, रा. नाना पेठ), ओमकार शिवप्रसाद साळुंखे (वय २१, रा. नाना पेठ), यश सुनील ससाणे (वय २०, रा. सय्यदनगर, हडपसर) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी व त्यांचे मित्र हे मोटारसायकलवरुन जात असताना कोंढवा-कात्रज रोडवरील आर. एम. डी. शाळेसमोर ते आले होते. त्यावेळी पाठीमागून स्पोर्टस बाईकवरुन आलेल्यांनी पिस्तुलातून गोळीबार करून फिर्यादीला जखमी केले होते. याप्रकरणी पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी मुनाफ पठाणसह १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी मोटारसायकलवरुन नाना पेठेतून हातात कोयते नाचवत आरडाओरडा करुन एक पोस्टर फाडले होते. आमच्या हद्दीत येऊन राडा केल्यावरुन कृष्णाराज आंदेकर व इतरांनी हा गोळीबार केला होता. या टोळीविरुद्ध कोंढवा तसेच फरासखाना, समर्थ, हडपसर पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे ९ गुन्हे दाखल असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्यांनी गुन्हे केले आहेत. शहरात त्यांची दहशत असून ते लोकांना दमदाटी करणे, लूटमार करणे असे प्रकार करीत असतात. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कडक कारवाईवर भर दिला असून त्यांनी आतापर्यंत २० मोक्का कारवाया केल्या असून चालू वर्षातील १४ वी टोळ्यांविरुद्धची ही कारवाई आहे.