शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पिंपरीत दोन टोळींवर मोक्का कारवाई, सोळा जणांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 3:40 PM

टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद

ठळक मुद्देपुणे, पिंपरी चिंचवड आणि सातारा जिल्ह्यात दहशत

पिंपरी: सराईत गुन्हेगार सुरेश उर्फ बॉबी विलास यादव आणि साहिल उर्फ खाऱ्या तानाजी जगताप याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमा अंतर्गत (मोक्का) कारवाई केली. दोन्ही टोळीतील सोळा जणांवर गुन्हा दाखल करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 

साहिल उर्फ खाऱ्या तानाजी जगताप (वय २३, रा आकुर्डी), रोहित हिंदुराव रकटे (वय २४, रा. आकुर्डी), शंकर लक्ष्मण दाते (वय २२, रा. चिंचवड गाव), सनी तायप्पा तलवार (वय २५, रा. आकुर्डी), आशिष केशव सुर्वे (वय २२, रा. तळवडे), नितिन राजेश सोनवणे (वय ३०, रा. चिंचवड गाव), सलमान उर्फ सलम्या अफजल खान (वय २४, रा. निगडी), कृष्णा इटकल, अबू तालिब शेख अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीवर पिंपरी चिंचवड, पुणे आणि सातारा जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दुसऱ्या घटनेत बॉबी उर्फ़ सुरेश विलास यादव (वय ३३), सनी उर्फ प्रवीण बाबूलाल सरपट्टा (वय २९, दोघे रा. आकुर्डी), प्रसाद उर्फ तांब्या लक्ष्मण सुतार (वय २६, आकुर्डी), विकी पोपट वाघ (वय २६, रा. आकुर्डी), जिग्नेश परशुराम सावंत (वय ३०, रा. चिखली), नरेंद्र उर्फ गुंड्या बाबूलाल सरपट्टा (वय २७, रा. आकुर्डी, ), कल्पेश संदीप पवार (वय २५, रा. आकुर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळी विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, दरोड्याची पूर्व तयारी , दुखापत, दंगा करणे, घरफोडी, मारामारी, अपहरण करून खून करणे असे , खुनाचा कट रचणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे १४ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि सातारा जिल्ह्यात दाखल आहेत.

निगडी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या या दोन्ही टोळ्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मार्फत मोका कारवाई प्रस्तावित केली होती. त्यानुसार कारवाई केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक