शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पप्पू गावडे खून प्रकरणातून गजा मारणे याची मोक्का न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 4:42 PM

जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता...

पुणे : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू गावडे खून प्रकरणामध्ये पौड येथे गुन्हा दाखल असलेल्या गजानन मारणे सह इतर आरोपींची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

विशेष मोक्का न्यायाधीश ए वाय थत्ते यांनी हा निकाल दिला असून, पुराव्याच्या अभावी आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. या प्रकरणात आरोपीतर्फे ऍड सुधीर शहा, ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड विपुल धुशिंग व ऍड जितू सावंत, ऍड विद्याधर कोशे, ऍड भरेकर यांनी कामकाज पाहिले. 

गजानन मारणे ( वय ४९), पप्पू उर्फ अतुल लक्ष्मण कुडले (वय ३०), रूपेश कृष्णराव मारणे, संतोष विश्वनाथ शेलार, सुनील नामदेव बनसोडे,  गणेश नामदेव हुंडारे ( वय ३२), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय २८), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३०), बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार (वय २७), बापू श्रीमंत बागल (वय ३०), गोरक्षनाथ तुकाराम हाळंदे (वय ३०), यशवंत उर्फ बाळा दासू बोकेफोडे (वय ३०), उमेश नागु टेमधरे, सतीश उर्फ आबा शिळीमकर अशी निर्दोष सुटका केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निलेश ज्ञानेश्वर जाधव यांनी पौड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. 

मौजे लवळे गावाच्या हददीतील गावडे वस्तीजवळ ३ नोव्हेंबर २०१४ मध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातील टोळीचे आर्थिक वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तसेच पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता. निलेश घायवळ आणि गजानन मारणे हे दोघे पूर्वीपासून आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी टोळ्या चालवितात. या दोन्ही टोळ्यांमध्ये फार पूर्वीपासून कोथरूड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी विक्री चे जुने वाद असून, या वादावरून व आर्थिक वर्चस्वावरून मारणे व घायवळ यांच्या टोळ्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत. २००८ मध्ये निलेश घायवळ व पप्पू उर्फ संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे , पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करून व कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

याप्रकरणी पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवरून, कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात साक्ष दिली तर तुला संपवून टाकू अशी धमकी त्यांनी पप्पू गावडे याला दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी पप्पूचा काटा काढला. यामध्ये आरोपी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार याने गुन्हयात वापरलेला चोपर, कोयता व इतर १ कोयता जप्त करण्यात आला होता. .......   

 

टॅग्स :PuneपुणेMurderखूनCourtन्यायालयPoliceपोलिस