वडगाव निंबाळकर स्टेशनच्या अधिपत्याखाली असलेल्या सोनकसवाडी येथे १६ फेब्रुवारी रोजी रोजी बंद खोलीची घरफोडी व आणखी एका खोलीतील व्यक्तीस चाकुचा धाक दाखवून दोन लाख १६ हजार रुपयांची लूट करण्यात आली होती. याप्रकरणी अजय शरद भोसले रा. नेर, ता. खटाव, दादा हनुमंत चव्हाण (गाववडी विसापूर, ता. खटाव), विकास किरण शिंदे (रा. नांदल, ता. फलटण, जि. सातारा), रावश्या कोब्या काळे (रा. लासुर्णे, ता. इंदापूर), कॅसेट ऊर्फ काशीनाथ ऊर्फ भीमराव भोसले (रा. आंदरुड, ता. फलटण) यांना अटक करुन १ लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर या दरोड्यातील आरोपी लखन पोपट भोसले (वडगाव) जयराम स्वामी (ता. खटाव) हा फरारी आहे.
या टोळक्याने पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोनकसवाडी, बारामती शहर तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलुज, करमाळा सातारा जिल्ह्यातील लोणंद, सातारा, फलटण आदी चौदा ठिकाणी बलात्कार, दरोडा, जबरी चोरी यांसारखे सर्व्हीस गुन्हे या तीन जिल्ह्यांमध्ये दाखल आहेत. सोनकसवाडी येथे झालेल्या दरोड्या प्रकरणी गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कार्यवाही होण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया याकडे वडगाव निंबाळकर पोलिसांकडून पाठवला होता.
सदर आरोपींवर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती स्थानिक गुन्हे शाखेचे पद्मावत घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, सपोई श्रीगणेश कवितके, योगेश शेलार, सहायक फौजदार पोपट जाधव, सूर्यकांत कुलकर्णी गोरख पवार, ज्ञानेश्वर सानप, बाळासाहेब पानसरे, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ, पोपट नाळे, सलमान खान, अक्षय सिताप यांनी केली होती. बारामती विभागात आतापर्यंत १९ टोळीतील १२५ आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे.