पुणे: राहुल गांधी यांनी नोटबंदीवर टिका केली होती. त्यांनी सांगितले होते की नोटबंदीमुळे देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे. काँग्रेस पक्षाने जी.एस.टी.च्या चूकीच्या पध्दतीने केलेल्या अमंलबजावणीला विरोध केला होता. राहुल गांधींनी मोदी सरकारला कोरोना संसर्ग बद्दल संवेदनशील राहण्यास सांगतिले होते. परंतु मोदी सरकारने त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केले. आणि त्याची किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागली. खासगीकरणाच्या नावाखाली सरकारी कार्यालय आणि कारखाने मोदी सरकारने विकायला काढलेले आहेत. असा आरोप छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेशजी बघेल यांनी केंद्र सरकारवर केला आहे.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेशजी बघेल यांचे स्वागत करण्यात आले. क्रांतीसूर्य, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान शहराध्यक्ष रमेश बागवे व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव, पश्चिम महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
''बेरोजगार व महागाई आज देशातील ज्वलंत समस्या आहे. या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी देशभर आंदोलन करीत आहे. १२ डिसेंबर २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात दिल्लीमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांचे हाथ मजबूत करण्यासाठी आपण सर्व काँग्रेस जणांनी काँग्रेस पक्षाचे कार्य समाजातील सर्व घटकांमध्ये पोहचवून मोदी सरकारच्या चूकीची आर्थिक धोरणाबद्दल जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.’’
राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीकोनामुळे आज भारत प्रगतशील देश
''राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या ऐतिहासिक वास्तूला ‘‘यह मकान सच्चे खिदमतगार/सेवको का बना रहे’’ असा शुभसंदेश दिला होता. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आज देशाची प्रगती झाली आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देश मजबूत करण्यासाठी अनेक धाडसी पाऊल उचलले. लाल बहाद्दूर शास्त्री यांनी जय जवान, जय किसानचा नारा दिला. इंदिरा गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला आणि देशात हरित क्रांती घडविली. राजीव गांधी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदृष्टीकोनामुळे आज भारत प्रगतशील देश आहे. मोदी सरकारच्या राजवटीत जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण झालेली आहे असेही ते म्हणाले आहेत.''