शक्तिप्रदर्शन करून मोहन जोशी व सुप्रिया सुळे यांनी भरला अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 07:26 PM2019-04-03T19:26:52+5:302019-04-03T19:28:27+5:30

पुणे व बारामतीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली. 

Mohan Joshi and Supriya Sule filed a form of lok sabha canditate.. | शक्तिप्रदर्शन करून मोहन जोशी व सुप्रिया सुळे यांनी भरला अर्ज 

शक्तिप्रदर्शन करून मोहन जोशी व सुप्रिया सुळे यांनी भरला अर्ज 

Next

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील मोहन जोशी व बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांनी शक्तीप्रदर्शन करून बुधवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज दाखल केले. पुणे व बारामतीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह मित्र पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली. 
दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यापुर्वी सकाळी नरपतगिरी चौकामध्ये सभा घेण्यात आली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार वंदना चव्हाण, महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, डॉ. विश्वजित कदम, संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, कुमार सप्तर्षी, चेतन तुपे, रमेश बागवे, प्रदीप गारटकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुळे या सभेच्या ठिकाणी पती सदानंद, मुलगी रेवती आणि मावळ लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांच्यासोबत आल्या होत्या. 
सभेनंतर रॅली काढून दोघे उमेदवार अर्ज भरण्यासाठी जातील, असे अपेक्षित होते. पण उन्हाचा तडाखा, गर्दी आणि वाहतुक कोंडीमुळे सभा सुरू असतानाच सुळे यांच्यासोबत हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटील, थोपटे, जगताप अर्ज भरण्यासाठी गेले. त्यानंतर तासाभराने पृथ्वीराज चव्हाण, वंदना चव्हाण, पटेल, कदम, गायकवाड यांच्यासोबत जाऊन जोशी यांनी अर्ज भरला. सभेमध्ये सर्वच नेत्यांनी मोदी सरकार व राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. चव्हाण म्हणाले, विरोधक व्यक्तीकेंद्रीत राजकारण करू पाहत आहेत. या ह्यट्रॅपह्णमध्ये न अडकता त्यांना मुळे मुद्यावर खेचून आणावे. त्यांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांना जाहीरनामाही आणता येणार नाही. मागच्या जाहीरनाम्याचे काय झाले हे त्यांना सांगावे लागेल.
कालपर्यंत आपण एकमेकांविरोधात लढलो असेल. पण आता सगळे विसरा, असे पवारांनाही सांगितले आहे. आता वेळ वेगळी असून एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
------------
अमोल कोल्हे ९ तारखेला अर्ज भरणार
शिरूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे मंगळवारी (दि. ९) अर्ज भरणार आहेत. तर पार्थ पवारही ८ किंवा ९ तारखेला अर्ज भरणार आहेत. त्यादिवशीही नरपतगिरी चौकात सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
------------

Web Title: Mohan Joshi and Supriya Sule filed a form of lok sabha canditate..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.