दौंड : तरुणीचा विनयभंग केल्यानंतर, जाब विचारायला गेलेल्या महिला व तरुणांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यासह आठ जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी नगराध्यक्ष बादशाहभाई शेख, वसीम शेख, राशीद शेख, वाहीद खान, आरबाज सय्यद, जुम्मा शेख, इलियास शेख, जिलाणी शेख व इतर दहा ते बारा व्यक्ती ( सर्व रा. कुंभारगल्ली, दौंड ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंभार गल्ली परिसरात २० ऑक्टोबरला पीडितेचा रशीद शेख व इलियास शेख यांनी भररस्त्यावर विनयभंग केला. त्यानंतर पीडितेचे नातेवाईक त्या त्या युवकांना जाब विचारण्यासाठी गेले असता तरुणीचे नातेवाईक त्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेले असता त्या तरुणांनी त्यांनाच दांडक्याने बेदम मारले. त्यानंतर टोळक्याने त्यांच्या घरी धुडगूस घालीत डोक्यात तलवारीने वार करण्याबरोबर दांडक्याने दात पाडून एकूण सात जणांना गंभीररीत्या जखमी केले.
याप्रकरणी आता माजी नगराध्यक्ष बादशाह शेख वसीम शेख यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बादहशाह शेख हे २९ वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी दौंड नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गटनेता आणि जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.