पुणे : दहावीचे पेपर्स देण्याच्या आमिषाने तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास विशेष न्यायाधीश एस. जे. काळे यांनी ३ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. हा प्रकार १० जानेवारी २०१४ ला घडला. रवींद्र भीमराव मांजरेकर (३०, रा. बोपोडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षीय मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पीडित मुलगी दहावीमध्ये नापास झाली होती. त्यामुळे ती १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेचा अभ्यास करीत होती. छाजेड पंप येथे थांबलेल्या पीडितेला आरोपीने दहावीचे पेपर्स देतो, असे सांगत गाडीत बसवले व विनयभंग केला. या प्रकरणी न्यायालयाने त्याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि १ हजारांचा दंड, तर बाललैंगिक अत्याचाराच्या कलम ८ नुसार तीन वर्षे सक्तमजुरी एक हजार रुपयांचा दंड सुनावला. त्याला ही शिक्षा एकत्रितरीत्या भोगावी लागणार आहे.
विनयभंगप्रकरणी सक्तमजुरी
By admin | Published: October 07, 2016 3:10 AM