पुष्कर कोतवाल ( वय २०, रा. कुंजीरवाडी ता.हवेली) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत मुलगी शिकत असलेल्या हायस्कुलमध्ये पुष्कर कोतवाल हा सुद्धा शिक्षण घेत होता. तो तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने त्रास देत होता. तिच्याकडे सतत बघणे, दुसऱ्यामार्फत तिच्याशी संपर्क साधने असा प्रयत्न करीत असे परंतू मुलगी त्याकडे दुर्लक्ष करत होती. २०१८ मध्ये ती बडमिंटन खेळण्यासाठी ती गेली असता पुष्कर याने तिचा पाठलाग करुन तिच्यावर प्रेम करत असल्याचे सांगितले. त्यावेळी ती घाबरुन निघून चालली असताना त्यांने
कोणत्या तरी टोकदार वस्तुने त्याच्या डाव्या हात कापून घेतला व प्रेमाला होकार नाही दिला तर आत्महत्या करण्याची धमकी दिली व बोलण्यास भाग पाडले होते. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याने तीच्या सोबत फोटो काढले. तिच्या इन्स्टाग्राम व स्नॅपचॅट सोशल मिडीयाचा पासवर्ड बळजबरीने मागून घेतला. मुलीला एकांतात भेटण्यास बोलावून तीच्याशी शारीरीक लगट करुन तीला स्पर्श करुन तीचा विनयभंग केला.
याबाबत पिढीत मुलीच्या कुटुंबियांनी पुष्कर याच्या घरी जाऊन त्याचे कुटुंबियांना झाले प्रकाराबाबत सांगीतले होते.
त्यानंतरही त्याने पिडीतेला आय मिस यु अशा प्रकारचे वारंवार ई-मेल पाठवुन त्रास दिला. १० जुलै रोजी सदर मुलगी आपल्या कुटुंबियांसमवेत पुणे- सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी गावच्या हद्दीतील आईसक्रिम पार्लर येथे गेली असता तेथेही तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती खुप घाबरुन गेली म्हणून सर्वजण तेथून त्याच्या दहशतीस घाबरुन निघून गेले. यामुळे पुष्कर याच्यापासून कुटुंबाला धोका असल्याची तक्रार पिढीत मुलीच्या वडीलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.
---