पुणे : शहरात सोमवारी १६५ कोरोनाबाधित आढळून आले असून, २५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ९७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़़ ७० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार १६७ इतकी आहे. आज दिवसभरात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १२ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २११ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ८६ हजार १४० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९६ हजार ९३७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८५ हजार ८१७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९५३ जणांचा मृत्यू झाला आहे.