पुणे : शहरातील १८७ केंद्रांवर सोमवारी १ नोव्हेंबरला प्रत्येकी २५० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( ९ ऑगस्टपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा ४ ऑक्टोबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.