लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात सोमवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे सुमारे दोन हजाराने अधिक असल्याचे दिसून आले आहे़ सोमवारी दिवसभरात ४ हजार ५८७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ६ हजार ४७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात २० हजार ८८९ जणांनी कोरोना तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची टक्केवारी ही २१़ ९५ टक्के इतकी आहे़
दरम्यान, आज दिवसभरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २२ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६५ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ५ हजार ९२६ कोरोनाबाधित रूग्ण हे आॅक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार २६७ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत १८ लाख ९० हजार ६२४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख ७१ हजार ८२४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख १० हजार ९६५ कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५४ हजार ६९६ इतकी झाली आहे़ रविवारी हाच आकडा ५६ हजार ६३६ इतका होता़
---------------------------------