पुणे : जिल्ह्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीचाच दिवस सोमवार हा दुर्दैवाने घातवार ठरला. जिल्ह्याच्या विविध ठिकाणी घडलेल्याअपघातांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला. त्यातही गंभीर व दुर्दैवी बाब म्हणजे यात चार लहान मुलांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यात दोन ठिकाणी मोठे अपघात झाले, तर पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या एका अपघातात तिघांचा मृत्यू झाला. जुन्नर तालुक्यात एका विधवा महिलेने पतीच्या निधनानंतर आलेल्या अस्वस्थतेमुळे आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या करून जीवन संपविले.खड्डा चुकविताना दोन लहानग्यांचा मृत्यू खळद : रस्त्यावरील खड्डा चुकविताना टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन लहान सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर आई-वडील गंभीर जखमी झाले.मिळालेल्या माहीतीनुसार सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद गावच्या हद्दीत रासकरमळा वस्तीजवळ अरूंद पुलावर हा अपघात घडला. आयशर टेम्पो (क्र. एम. एच. १२ एफ. सी. ८१४४) हा सासवडहून जेजुरीच्या दिशेने जात असताना जेजुरीहुन सासवडकडे जाणारी हिरो होंडा स्प्लेंडर (एम. एच. २३, ए. ए. ३८६५) यांच्यात धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की या धडकेत काजल प्रकाश जाधव (वय ३ वर्ष), अर्चना प्रकाश जाधव (वय २ वर्ष) या बहिणींचा मृत्यू झाला तर त्यांची आई लक्ष्मी प्रकाश जाधव (वय २३ वर्ष), वडील प्रकाश लक्ष्मण जाधव (वय २६ वर्ष), भाऊ रोहन प्रकाश जाधव (वय ५ वर्ष), बहीण वैशाली प्रकाश जाधव (वय ७ वर्ष), (सर्व रा. राजेटाकळी, ता. घनसांगी, जि.जालना सध्या. रा. निमगाव पाटी, अकलुज, सोलापूर) हे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले.याबाबत राष्टÑीय महामार्गाच्या अधिका-यांशी चर्चाकेली असता त्यांनी एक वर्षापुर्वीया रस्त्यावर राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांच्या माध्यमातुन काही कोटी रूपयेखर्च करून दुरूस्ती करण्यात आली होती ती अजुन बाकी असताना व रस्त्याचेकाम अर्धवट असताना आम्हाला यावर काम करता येत नसल्याचेस्पष्ट केले, तर जेथे आमच्या नियमानुसार काम पुर्णझालेआहेत्या भागात आम्ही दुरूस्तीला सुरूवात केली आहे तर ज्या भागात रस्त्याचेकाम अर्धवट आहेतेथे मात्र रस्ता जरी आमच्याक डेवर्ग झाला असला तरी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागानेच दुरूस्ती करावी .- श्रुती नाईक,उपअभियंता राष्ट्रीय महामार्गपालखी महामार्गावर मोठमोठे खडडे् पडले असुन गेली काही दिवसयाची दुरूस्ती झाली नसल्याने रोज या मार्गावर लहान मोठे अपघात होत असुन या मार्गाची दुरूस्ती सध्या राज्य मार्ग व राष्टÑीय महामार्ग यांच्या हस्तांतराच्या वादात अडकली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली असता ते म्हणाले, की आमच्या वादात या रस्त्याची दुरूस्ती रखडणार नाही. आज सोमवारी रात्रीच सासवड जेजुरी रस्त्याच्या खड्ड्याची माहीती घेऊन मंगळवारीच याची तातडीने दुरूस्ती केली जाईल. त्यात दिरंगाई होणार नाही याची काळजी घेऊ.- धनंजय देशपांडे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे.इंदापूर-अकलूज रस्त्यावर अपघातात दुचाकीस्वार ठारइंदापूर : इंदापूर - अकलूज रस्त्यावर वडापुरीजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याचा जोडीदार जखमी झाला आहे. आज दुपारी एक वाजता ही घटना घडली.या अपघातात संतराज छेदी शर्मा (वय २३, रा. मुळ उत्तर प्रदेश, सध्या टेंभूर्णी नाका, इंदापूर) याचा मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी अतुल श्रीअद्याराम गौड (रा. मुळ उत्तर प्रदेश, सध्या टेंभूर्णी नाका, इंदापूर) हा जखमी झाला आहे. ते दुचाकी गाडी क्रमांक एमएच ४२/सी १०४९ वरून इंदापूरकडे येत होते. वडापुरी नजिक टिलर क्रमांक आरजे १४/जी ३००० ची ठोक बसल्याने संतराज जागीच मयत झाला. तर अतुल गौड जखमी झाला आहे. या प्रकरणी ओमप्रकाश श्रीरंगलाल विना या टिलर चालकास ताब्यात घेतले आहे. तो मूळचा राजस्थानचा आहे.पुणे-पंढरपूर महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यूनीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास नीरा (ता. पुरंदर) नजीक एका टायरच्या दुकानासमोर वाहनाला ओव्हरटेक करताना दहाचाकी ट्रेलर (मोठा ट्रक) व दुचाकी यांच्यात मोठा अपघात झाला. दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिसुर्टी (ता. पुरंदर) येथील गोपीनाथ जगन्नाथ बरकडे (वय ३२) व त्यांच्या पत्नी नीलम व मुले ओम, पार्थ व मुलगी जननी यांना दुचाकीवर घेऊन नीरेकडे आधार कार्ड लिंक करण्यासाठी चालले होते. या वेळी पुढे जाण्यासाठी चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना नीरेकडून जेजुरीच्या दिशेने निघालेल्या समोरून येणाºया दहाचाकी ट्रेलरचा अंदाज न आल्याने दुचाकी व ट्रेलर यांच्यात अपघात झाला.या अपघातात गोपीनाथ यांच्या पत्नी नीलम (वय २८), मुले ओम (वय साडेतीन वर्षे), पार्थ (वय दीड वर्ष) यांचा जागीच मृत्यू झाला, तर गोपीनाथ (वय ३२) व मुलगी जननी (वय ४) गंभीर जखमी झाले आहेत. मृतांना शवविच्छेदनासाठी जेजुरी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात हलविण्यात आले असून, गोपीनाथ यांच्यावर लोणंद (ता. खंडाळा) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून, मुलगी जननीला नीरेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, घटनेची माहिती कळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सुदर्शन होळकर, देवेंद्र खाडे, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, रामचंद्र कर्नवर व पोलीस मित्रांनी घटनास्थळी भेट दिली.पेट्रोलिंग करणारे कर्मचारीही वेळेत मदतीला धावल्याने जखमींना पुढील उपचारासाठी लवकर हलविणे शक्य झाल्याचे होळकर यांनी सांगितले. या घटनेची फिर्याद बरकडे यांचे चुलते सतीश अण्णा बरकडे यांनी नीरा पोलिसात दिली आहे.
सोमवार ठरला अपघातवार! पुणे जिल्ह्यात विविध अपघातांत ६ जणांचा मृत्यू : २ लहानग्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:58 AM