निमगाव केतकी येथील शेतकरी आज पोलीस आयुक्तालयात आले होते. अभयकुमार गांधी यांनी सांगितले की, मी ८ लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. पतसंस्था बंद पडली. पैशांची गरज होती. त्यामुळे २०१७ मध्ये आम्ही ४० टक्के रक्कम स्वीकारून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून दिले. आता पोलिसांच्या कारवाईमुळे आमचे उरलेले ६० टक्के रक्कमही परत मिळाली आहे.
तुकाराम भोसले यांनी सांगितले की, माझे वडील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल होते. त्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे नाईलाजाने ४० टक्के रक्कम स्वीकारली होती. आता पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे सर्व पैसे मिळाले आहेत.
फाशी घ्यायची आहे ते समोर झाड बघ
जितेंद्र कंडारे याला गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी शासनाने नेमणूक केली होती. मात्र, त्याने त्याचा गैरफायदा घेत गुंतवणूकदारांनाच त्रास दिला. बीआरएच च्या कार्यालयात येणाऱ्र्या कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते. दिवसभर बाहेर बसवून ठेवत. तेथील कर्मचारी कागदपत्रेही खिडकीतून लोकांवर फेकून देत. असाह्यपणे कोणी त्यांना म्हटले की, आता फाशीच घेतो, तर ते लोक निदर्यतेने वागत होते. फाशी घेतो म्हणणाऱ्यांना ते बघ समोर झाड आहे. जा जाऊन फाशी दे, असा अनुभव सचिन दोशी यांनी सांगितले.
.....
निमगाव केतकी येथील बीआरएच पतसंस्थेने सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. गेल्या १० दिवसांत त्यांनी डाळींब उत्पादक शेतकऱ्र्यांसह इतरांचे पैसे परत केले आहेत. आतापर्यंत जवळपास पावणे दोन कोटी रुपये कंपनीने परत केल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे अन्य कंपन्यांनी ठेवीदारांचे उरलेले पैसे परत दिले तर ते कारवाईपासून वाचू शकतील, असे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुचेता खोकले व संदीप भोसले यांनी सांगितले.