पुणे : ताली बजा के भी पैसा नही मिलता...बेपारी लोग का बोहानी नही होता तो वो हम हिजडों को क्या देगा... ८ दिनोसे खाने का वांधा है. शरीर बेचके भी पैसा नही मिल रहा है..हमारे जैसे भी तकलिफ सह रहे है, तो मेरी देश के लोगोसे बिनती है की सरकारके अच्छे काम के लिए पचास दिन तकलिफ सहे.बुधवार पेठेतील वेश्यावस्तीमध्ये देहविक्रय करणाऱ्यांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या आशीर्वाद संस्थेची अध्यक्ष पन्ना गाब्रेल या तृतियपंथीय महिलेचे हे उद्गार आहेत. सुट्या पैशांच्या अभावी वेश्यावस्तीमध्येही वर्दळ खूपच कमीच असल्याचे सांगितले जाते. एकावेळी अडीचशे ते तीनशे रुपये कमाविणाऱ्या वेश्या आणि टाळ्या वाजवून भिक्षा मागणारे तृतियपंथीय यांच्याही चेहऱ्यावर चिंता आहे.श्रीकृष्ण चित्रपटगृहासमोरच्या परिसरात या वस्त्या आहेत. अडीचशे तृतियपंथीय आणि सुमारे १२ हजार वेश्या बुधवार पेठेच्या या भागात आहेत. एका इमारतीत आशीर्वाद संस्था चालविणारी पन्ना गाबेल म्हणाली, ‘‘दो वक्त की रोटी कमाना कितना मुश्किल है, ये हम हिजडा लोगही जान सकते है. ताली बजाकर भीख मांगने जो जाते है, उनका बस्तीसे बाहर जानाही बंद है. दुकानदार के पास भी पैसा नही तो वो हमको क्या देगा? लोगो के पास भी पैसे नही तो वो बच्चोपर उतारकर हमको क्या देंगे? पहले हमको दिन मे अडीचसो, तिनसो रुपया ताली बजाकर मिलता था. पिछले ८ दिनोसे बहोत कम पैसा हमारे लोगो को मिल रहा है. ’’
शरीर बेचके भी पैसा नही मिल रहा..
By admin | Published: November 18, 2016 6:28 AM